करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण, तात्काळ दुरुस्तीची कामे हाती घ्या. सतिष नीळ यांचा आंदोलनाचा इशारा

By : Polticalface Team ,16-07-2024

करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण, तात्काळ दुरुस्तीची कामे हाती घ्या. सतिष नीळ यांचा आंदोलनाचा इशारा

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रमुख रस्त्यांची दुरावस्था झाली असून अनेक गावांना तालुक्याला जोडणाऱा डांबरी रस्ताच राहीला नसुन रस्त्या वरील डांबर निघून गेले आहे.अनेक ठिकाणी फक्त मातीचे रस्ते व गुडघ्याऐवढे खड्डे झाले आहेत.पावसाळा सुरू होण्यापूर्वी बांधकाम विभागाने दुरुस्ती करणे आवश्यक होते.सद्या पावसाळा सुरू असल्याने खड्ड्यात पाणी साचून राहील्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.बांधकाम विभागाने याची दखल घेऊन तात्काळ दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत अन्यथा करमाळा तालुक्यातील नागरीकांच्या वतीने संपूर्ण तालुक्यातील रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करुन आंदोलन करण्यात येईलअसा इशारा मकाई सहकारी साखर कारखाना संचालक सतीश नीळ यांनी दिला आहे. यावेळी नीळ यांनी बोलताना सांगितले की करमाळा तालुक्यातील पोमलवाडी ते केतूर,सावडी फाटा ते केतूर, वाशिंबे चौफूला ते राजुरी, दिव्हेगव्हान ते कुंभारगाव,पूर्व सोगाव-ऊमरड,कुगाव -चिखलठाण-शेटफळ,वाशिंबे ते सोगाव ते राजुरी,राजूरी ते पोंधवडी, फिसरे ते हिवरे, कोळगाव, गौंडरे ते नेरले,साडे ते सौंदे (गुळसडी मार्ग)ते करमाळा,बिटरगाव (श्री ), तरडगाव पर्यंतचा या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून रस्त्यावरून प्रवास करताना शेतकरी,नागरिक,शालेय विद्यार्थ्यांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताला निमंत्रण मिळत आहे.त्यात संततधार पावसामुळे रस्त्यांच्या दुरावस्थेत वाढ झाली आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे बुजवून आवश्यक ठिकाणी नवीन रस्ते बनविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.परंतू वारंवार मागणी करुनही बांधकाम विभागाकडून कसल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही.त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. वाचक क्रमांक : Visit counter For Websites


पाटस येथील तक्षशिला बुद्ध विहारात वर्षावास समाप्ती. कोजागिरी पौर्णिमा निमीत्त सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन. तथागत गौतम बुद्ध मूर्तीची केली स्थापना.

महाराष्ट्र शासन संत सेवालाल महाराज लमाण तांडा योजनेच्या दौंड तालुका अशासकीय सदस्य पदी मिथुन राठोड यांची निवड..

मराठा सेवा संघाच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त दशरथआण्णा कांबळे यांचा मराठा मार्गदर्शक सामाजिक गौरव पुरस्काराने सन्मान....

दौंड पोलीस प्रशासनाचे जाहीर आवाहन. आदर्श आचारसंहितेचे पालन करा. पूर्वपरवानगी शिवाय कोणतेही राजकीय कार्यक्रम करू नयेत. पोलीस निरीक्षक गोपाळ पवार.

डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंतीनिमित्त विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा .

अखेर कृषी व महसूल विभागाचे अधिकारी नुकसानग्रस्त शेतकरी श्री आल्हाट यांच्या बांधावर

विजयादशमीनिमित्त सामाजिक बांधिलकी व गुणवत्तेचा सन्मान व्हावा - प्रा.गणेश करे-पाटील. रावगाव विद्यालयास यशकल्याणीकडून ६ स्मार्ट टि.व्ही.संच प्रदान..!

संजयमामा शिंदे यांच्या आमदार पदाची व्हॅलिडिटी संपली, पाच वर्षे विकासाचे नेटवर्क गायब झाल्याने मतदार आता बदल करणार : प्रवक्ते तळेकर

आजपासूनच आचारसंहिता लागणार म्हणजे नेमकं काय होणार? सर्वसामान्यांसाठी काय बदलणार?

करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी सय्यद भाई यांचे चिरंजीव जमील भाई सय्यद यांचा मराठा मित्र पुरस्कार देऊन करमाळा येथे झाला सन्मान

उजनी धरणातून सोडलेले कॅनॉलचे पाणी उद्यापासून बंद! धरणात सध्या 123 TMC पाणी; 15 जानेवारीदरम्यान धरणातून सुटणार शेतीसाठी पहिले आवर्तन

इंदापूर तालुक्यात वंचित बहुजन युवा आघाडीच्या तीन शाखांचे जल्लोषात उद्घाटन

राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हाबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ?तुतारी आणि पिपाणी मोठा गोंधळ उडणार ?

आईने कष्टाने घेऊन दिलेली गाडी चोरीला गेली “आईची शेवटची आठवण, प्लीज परत करा..” पुणेकर तरुणाची पाटी पाहून व्हाल भावुक

डोक्यात दगड घालून मित्राचा खून; इंदापूरातील घटना

बारामतीच्या टीसी कॉलेज परिसरात बेशिस्त वाहन चालकांना वाहतूक शाखेचा जोरदार दणका! 84 वाहनांवर कारवाई! पाऊण लाखांचा दंड

मोठी बातमी : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले; 20 नोव्हेंबरला मतदान 23 ला निकाल

आगामी विधानसभा निवडणुकीतून माघार नाही भाजपाची उमेदवारी मलाच मिळेल, भाजपा नेत्या सुवर्णाताई पाचपुते यांचे पत्रकार परिषदेत सुतवाच्य

मुलनिवासी बहुजनांना राष्ट्रीय स्तरावर एकत्र यावे लागेल - कमलकांत काळे राष्ट्रीय अध्यक्ष

पिसोरेखांडच्या नवनिर्वाचित सरपंच श्रीमती लीलावती येरकळ यांचा नागवडेंकडून सन्मान