मुलनिवासी बहुजनांना राष्ट्रीय स्तरावर एकत्र यावे लागेल - कमलकांत काळे राष्ट्रीय अध्यक्ष

By : Polticalface Team ,15-10-2024

मुलनिवासी बहुजनांना राष्ट्रीय स्तरावर एकत्र यावे लागेल - कमलकांत काळे राष्ट्रीय अध्यक्ष

श्रीगोंदा प्रतिनिधी :देशभरामध्ये ९० च्या दशकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा जो दबदबा होता. 

त्या माध्यमातून देशांमध्ये नवीन विचाराच्या क्रांतीला सुरुवात झाली होती, आज मात्र वास्तवामध्ये या महापुरुषांच्या नावाने लाखो संघटना आहेत. परंतु प्रतिगामी मनुवादी प्रवृत्ती मात्र प्रबळ झाली आहे, हे थांबवायचं असेल तर राष्ट्रीय स्तरावर मूलनिवासी बहुजनांना एकत्रित येऊन एक व्यापक लढा उभा करावा लागेल. त्यासाठी त्यागी आणि समर्पित भावनेने काम करणाऱ्या प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फळी राष्ट्रीय पातळीवर उभा करण्याचा मानस ‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘चे राष्ट्रीय अध्यक्ष कमलाकांत काळे यांनी व्यक्त केला. श्रीगोंदा येथे एक दिवशीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते, यावेळी बोलताना त्यांनी देशातील मूलनिवासी बहुजनांचा इतिहास व प्रतिगामी मनुवादी प्रवृत्ती कडून होणारे नुकसान यावर सविस्तर मांडणी केली. 

 युनिटी ऑफ मूलनिवासी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी श्रीगोंदा येथील बौद्ध व जैन विचारांचे अभ्यासक, तत्त्वचिंतक प्रा. अजित खरसडे यांची निवड करण्यात आली तसेच राष्ट्रीय उपाध्यक्षपदी पारनेरचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र करंदीकर यांची नियुक्ती करण्यात आली.याप्रसंगी पुणे, अहमदनगर, सोलापूर, बीड येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

पाटस येथील तक्षशिला बुद्ध विहारात वर्षावास समाप्ती. कोजागिरी पौर्णिमा निमीत्त सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन. तथागत गौतम बुद्ध मूर्तीची केली स्थापना.

महाराष्ट्र शासन संत सेवालाल महाराज लमाण तांडा योजनेच्या दौंड तालुका अशासकीय सदस्य पदी मिथुन राठोड यांची निवड..

मराठा सेवा संघाच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त दशरथआण्णा कांबळे यांचा मराठा मार्गदर्शक सामाजिक गौरव पुरस्काराने सन्मान....

दौंड पोलीस प्रशासनाचे जाहीर आवाहन. आदर्श आचारसंहितेचे पालन करा. पूर्वपरवानगी शिवाय कोणतेही राजकीय कार्यक्रम करू नयेत. पोलीस निरीक्षक गोपाळ पवार.

डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंतीनिमित्त विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा .

अखेर कृषी व महसूल विभागाचे अधिकारी नुकसानग्रस्त शेतकरी श्री आल्हाट यांच्या बांधावर

विजयादशमीनिमित्त सामाजिक बांधिलकी व गुणवत्तेचा सन्मान व्हावा - प्रा.गणेश करे-पाटील. रावगाव विद्यालयास यशकल्याणीकडून ६ स्मार्ट टि.व्ही.संच प्रदान..!

संजयमामा शिंदे यांच्या आमदार पदाची व्हॅलिडिटी संपली, पाच वर्षे विकासाचे नेटवर्क गायब झाल्याने मतदार आता बदल करणार : प्रवक्ते तळेकर

आजपासूनच आचारसंहिता लागणार म्हणजे नेमकं काय होणार? सर्वसामान्यांसाठी काय बदलणार?

करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी सय्यद भाई यांचे चिरंजीव जमील भाई सय्यद यांचा मराठा मित्र पुरस्कार देऊन करमाळा येथे झाला सन्मान

उजनी धरणातून सोडलेले कॅनॉलचे पाणी उद्यापासून बंद! धरणात सध्या 123 TMC पाणी; 15 जानेवारीदरम्यान धरणातून सुटणार शेतीसाठी पहिले आवर्तन

इंदापूर तालुक्यात वंचित बहुजन युवा आघाडीच्या तीन शाखांचे जल्लोषात उद्घाटन

राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हाबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ?तुतारी आणि पिपाणी मोठा गोंधळ उडणार ?

आईने कष्टाने घेऊन दिलेली गाडी चोरीला गेली “आईची शेवटची आठवण, प्लीज परत करा..” पुणेकर तरुणाची पाटी पाहून व्हाल भावुक

डोक्यात दगड घालून मित्राचा खून; इंदापूरातील घटना

बारामतीच्या टीसी कॉलेज परिसरात बेशिस्त वाहन चालकांना वाहतूक शाखेचा जोरदार दणका! 84 वाहनांवर कारवाई! पाऊण लाखांचा दंड

मोठी बातमी : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले; 20 नोव्हेंबरला मतदान 23 ला निकाल

आगामी विधानसभा निवडणुकीतून माघार नाही भाजपाची उमेदवारी मलाच मिळेल, भाजपा नेत्या सुवर्णाताई पाचपुते यांचे पत्रकार परिषदेत सुतवाच्य

मुलनिवासी बहुजनांना राष्ट्रीय स्तरावर एकत्र यावे लागेल - कमलकांत काळे राष्ट्रीय अध्यक्ष

पिसोरेखांडच्या नवनिर्वाचित सरपंच श्रीमती लीलावती येरकळ यांचा नागवडेंकडून सन्मान