बारामतीच्या टीसी कॉलेज परिसरात बेशिस्त वाहन चालकांना वाहतूक शाखेचा जोरदार दणका! 84 वाहनांवर कारवाई! पाऊण लाखांचा दंड

By : Polticalface Team ,16-10-2024

बारामतीच्या टीसी कॉलेज परिसरात बेशिस्त वाहन चालकांना वाहतूक शाखेचा जोरदार दणका! 84 वाहनांवर कारवाई! पाऊण लाखांचा दंड

 बारामती जनआधार न्युजभिमसेन जाधव बारामती : 

वाहतूक नियमांचे उल्लंघन करून विनाकारण त्रास देणाऱ्या व उगीचच दुचाकीवरून फिरणाऱ्या टुकारांना दणका देत बारामतीच्या वाहतूक शाखेने टी.सी. कॉलेज परिसरात आज मोहीम राबवत तब्बल 84 वाहन चालकांना पाऊण लाखांचा दंड ठोठावला. बारामती शहरातील तुळजाराम चतुचंद महाविद्यालयाच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

शहरात काळ्या काचा लावून फिरणारे वाहनचालक चांगलेच वाढले आहेत आणि दुसरीकडे महाविद्यालयाच्या परिसरात टुकार, सडकसख्याहारी, रोडरोमिओ आणि उगीचच बेशिस्तपणे दुचाकी चालवून रस्त्यावरील नागरिक विद्यार्थी, विद्यार्थिनींना त्रास देणारे देखील वाढले आहेत. या सर्वांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात होती त्यामुळे आज वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवून मोटार वाहन कायद्यांतर्गत मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली. 


तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय परिसरात मुला-मुलींची मोठया प्रमाणात रहदारी असते.त्या ठिकाणी मोक्कार विनाकारण फिरणाऱ्या टुकार तरुणांकडून बुलेट गाड्यांचे सायलेंसर काढून मोठा फटाका आवाज काढण्याचे प्रकार घडत असल्याबाबत वाहतुक शाखेकडे अनेक तक्रारी प्राप्त होत्या. यावर ठोस कारवाई म्हणून ही कारवाई करण्यात आली. आज (दि.१४ रोजी) सकाळी १० ते १. ३० वाजेपर्यंतच्या कालावधीत अशा हुल्लडबाजांवर मोटार वाहन कायद्यांखाली वेगवेगळ्या कलमांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये विनापरवाना वाहन चालवणाऱ्या सहा प्रकरणात ३० हजार रुपये दंड ठोठावला, तर वाहन चालक परवाना न बाळगण्याची ४६ प्रकरणे शोधून २३ हजार रुपयांहून अधिक दंड करण्यात आला, फॅन्सी व खराब नंबर प्लेटची ११ प्रकरणे समोर आली, त्यामध्ये ५ हजार ५०० रुपये दंड व  ट्रिपल सीटची १० प्रकरणे व १० हजार रुपये दंड, काळी काच लावून फिरत असलेल्या वाहनावरही दंड करण्यात आला. मोटार वाहन कायद्याखाली वेगवेगळ्या कलमानुसार एकूण ८४ प्रकरणातून ७० हजार ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार,  उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केली असून या कारवाईत बारामती वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार प्रशांत चव्हाण, सुभाष काळे, पोलीस हवालदार प्रदीप काळे, महिला पोलीस हवालदार स्वाती काजळे, रूपाली जमदाडे, सीमा साबळे, माया निगडे, सविता धुमाळ, रेश्मा काळे तसेच पोलीस कॉन्स्टेबल अजिंक्य कदम व प्रज्योत चव्हाण आदींनी 

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

पाटस येथील तक्षशिला बुद्ध विहारात वर्षावास समाप्ती. कोजागिरी पौर्णिमा निमीत्त सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन. तथागत गौतम बुद्ध मूर्तीची केली स्थापना.

महाराष्ट्र शासन संत सेवालाल महाराज लमाण तांडा योजनेच्या दौंड तालुका अशासकीय सदस्य पदी मिथुन राठोड यांची निवड..

मराठा सेवा संघाच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त दशरथआण्णा कांबळे यांचा मराठा मार्गदर्शक सामाजिक गौरव पुरस्काराने सन्मान....

दौंड पोलीस प्रशासनाचे जाहीर आवाहन. आदर्श आचारसंहितेचे पालन करा. पूर्वपरवानगी शिवाय कोणतेही राजकीय कार्यक्रम करू नयेत. पोलीस निरीक्षक गोपाळ पवार.

डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंतीनिमित्त विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा .

अखेर कृषी व महसूल विभागाचे अधिकारी नुकसानग्रस्त शेतकरी श्री आल्हाट यांच्या बांधावर

विजयादशमीनिमित्त सामाजिक बांधिलकी व गुणवत्तेचा सन्मान व्हावा - प्रा.गणेश करे-पाटील. रावगाव विद्यालयास यशकल्याणीकडून ६ स्मार्ट टि.व्ही.संच प्रदान..!

संजयमामा शिंदे यांच्या आमदार पदाची व्हॅलिडिटी संपली, पाच वर्षे विकासाचे नेटवर्क गायब झाल्याने मतदार आता बदल करणार : प्रवक्ते तळेकर

आजपासूनच आचारसंहिता लागणार म्हणजे नेमकं काय होणार? सर्वसामान्यांसाठी काय बदलणार?

करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी सय्यद भाई यांचे चिरंजीव जमील भाई सय्यद यांचा मराठा मित्र पुरस्कार देऊन करमाळा येथे झाला सन्मान

उजनी धरणातून सोडलेले कॅनॉलचे पाणी उद्यापासून बंद! धरणात सध्या 123 TMC पाणी; 15 जानेवारीदरम्यान धरणातून सुटणार शेतीसाठी पहिले आवर्तन

इंदापूर तालुक्यात वंचित बहुजन युवा आघाडीच्या तीन शाखांचे जल्लोषात उद्घाटन

राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हाबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ?तुतारी आणि पिपाणी मोठा गोंधळ उडणार ?

आईने कष्टाने घेऊन दिलेली गाडी चोरीला गेली “आईची शेवटची आठवण, प्लीज परत करा..” पुणेकर तरुणाची पाटी पाहून व्हाल भावुक

डोक्यात दगड घालून मित्राचा खून; इंदापूरातील घटना

बारामतीच्या टीसी कॉलेज परिसरात बेशिस्त वाहन चालकांना वाहतूक शाखेचा जोरदार दणका! 84 वाहनांवर कारवाई! पाऊण लाखांचा दंड

मोठी बातमी : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले; 20 नोव्हेंबरला मतदान 23 ला निकाल

आगामी विधानसभा निवडणुकीतून माघार नाही भाजपाची उमेदवारी मलाच मिळेल, भाजपा नेत्या सुवर्णाताई पाचपुते यांचे पत्रकार परिषदेत सुतवाच्य

मुलनिवासी बहुजनांना राष्ट्रीय स्तरावर एकत्र यावे लागेल - कमलकांत काळे राष्ट्रीय अध्यक्ष

पिसोरेखांडच्या नवनिर्वाचित सरपंच श्रीमती लीलावती येरकळ यांचा नागवडेंकडून सन्मान