नागवडे इंग्लिश मीडियम ची बालदिंडी उत्साहात संपन्नबाल वारकऱ्यांनी केली संतांची वेशभूषा l दुमदुमला हरिनामाचा गजर

By : Polticalface Team ,16-07-2024

नागवडे इंग्लिश मीडियम ची बालदिंडी उत्साहात संपन्नबाल वारकऱ्यांनी केली संतांची वेशभूषा l दुमदुमला हरिनामाचा गजर

श्रीगोंदा प्रतिनिधी : पाऊले चालती पंढरीची वाट...श्रीगोंदा ही संतांची भूमी समजली जाते. या भूमीतील श्री संत शेख महंमद महाराज यांना देशातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक समजले जाते. आषाढी एकादशीचे औचित्य साधत "नागवडे इंग्लिश मीडियम" च्या बाल वारकऱ्यांनी "माऊली माऊली माऊली" च्या नाम घोषात शेख महंमद महाराजांच्या प्रांगणामध्ये दिंडी सोहळा भक्तीमय वातावरणात साजरा केला. प्रसंगी बाल वारकऱ्यांनी भारुड सादर करून भारतीय रुढी आणि परंपरा यांचे महत्त्व तसेच त्यांचे वैज्ञानिक दृष्ट्या कारण उपस्थितांच्या लक्षात आणून देत नैतिकतेचा संदेश या निमित्ताने दिला.तसेच खास महाराष्ट्रीयन कला अशी ओळख असलेल्या पावली, झांज आणि लेझीम पथकांनी कार्यक्रमात रंग भरला. तर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नृत्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम होते. यावेळी श्री निकम यांच्यासह ज्ञानदीप ग्रामीण विकास संस्थेचे निरीक्षक बी. के. लगड, डॉ. चंद्रकांत कोथिंबिरे यांनी बाल वारकऱ्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मा.नगरसेविका गयाताई सुपेकर, कुंदन धालवडे, पाथरे साहेब, सुरेखा ताई लकडे, पूनम ताई फिरोदिया यांच्यासह महिला पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, विश्वस्त अनुराधाताई नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय प्रशासन विद्यार्थ्यांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबवत असते. "आषाढी वारी" ही महाराष्ट्राची एक ओळख, परंपरा आहे. त्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये संतांचे असणारे महत्त्व, त्यांनी केलेला त्याग विद्यार्थ्यांचा बालमनांवर बिंबवावा यासाठी प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणावर वारी, दिंडी साजरी करत असल्याचे निरीक्षक एस.पी. गोलांडे यांनी सांगितले. "विद्यालयाची बाल दिंडी शेख महंमद महाराज मंदिराकडे मार्गस्थ होत असताना श्रीगोंदा तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष श्री प्रशांत उबाळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले." दिंडी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी निरीक्षक एस.पी.गोलांडे, मुख्याध्यापिका नीतू दुलानी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका नागवडे यांनी केले.तर प्रमुख पाहुणे व मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या महिला पालकांचे निरीक्षक श्री.गोलांडे यांनी आभार मानले. वाचक क्रमांक : Visit counter For Websites


पाटस येथील तक्षशिला बुद्ध विहारात वर्षावास समाप्ती. कोजागिरी पौर्णिमा निमीत्त सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन. तथागत गौतम बुद्ध मूर्तीची केली स्थापना.

महाराष्ट्र शासन संत सेवालाल महाराज लमाण तांडा योजनेच्या दौंड तालुका अशासकीय सदस्य पदी मिथुन राठोड यांची निवड..

मराठा सेवा संघाच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त दशरथआण्णा कांबळे यांचा मराठा मार्गदर्शक सामाजिक गौरव पुरस्काराने सन्मान....

दौंड पोलीस प्रशासनाचे जाहीर आवाहन. आदर्श आचारसंहितेचे पालन करा. पूर्वपरवानगी शिवाय कोणतेही राजकीय कार्यक्रम करू नयेत. पोलीस निरीक्षक गोपाळ पवार.

डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंतीनिमित्त विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा .

अखेर कृषी व महसूल विभागाचे अधिकारी नुकसानग्रस्त शेतकरी श्री आल्हाट यांच्या बांधावर

विजयादशमीनिमित्त सामाजिक बांधिलकी व गुणवत्तेचा सन्मान व्हावा - प्रा.गणेश करे-पाटील. रावगाव विद्यालयास यशकल्याणीकडून ६ स्मार्ट टि.व्ही.संच प्रदान..!

संजयमामा शिंदे यांच्या आमदार पदाची व्हॅलिडिटी संपली, पाच वर्षे विकासाचे नेटवर्क गायब झाल्याने मतदार आता बदल करणार : प्रवक्ते तळेकर

आजपासूनच आचारसंहिता लागणार म्हणजे नेमकं काय होणार? सर्वसामान्यांसाठी काय बदलणार?

करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी सय्यद भाई यांचे चिरंजीव जमील भाई सय्यद यांचा मराठा मित्र पुरस्कार देऊन करमाळा येथे झाला सन्मान

उजनी धरणातून सोडलेले कॅनॉलचे पाणी उद्यापासून बंद! धरणात सध्या 123 TMC पाणी; 15 जानेवारीदरम्यान धरणातून सुटणार शेतीसाठी पहिले आवर्तन

इंदापूर तालुक्यात वंचित बहुजन युवा आघाडीच्या तीन शाखांचे जल्लोषात उद्घाटन

राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हाबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ?तुतारी आणि पिपाणी मोठा गोंधळ उडणार ?

आईने कष्टाने घेऊन दिलेली गाडी चोरीला गेली “आईची शेवटची आठवण, प्लीज परत करा..” पुणेकर तरुणाची पाटी पाहून व्हाल भावुक

डोक्यात दगड घालून मित्राचा खून; इंदापूरातील घटना

बारामतीच्या टीसी कॉलेज परिसरात बेशिस्त वाहन चालकांना वाहतूक शाखेचा जोरदार दणका! 84 वाहनांवर कारवाई! पाऊण लाखांचा दंड

मोठी बातमी : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले; 20 नोव्हेंबरला मतदान 23 ला निकाल

आगामी विधानसभा निवडणुकीतून माघार नाही भाजपाची उमेदवारी मलाच मिळेल, भाजपा नेत्या सुवर्णाताई पाचपुते यांचे पत्रकार परिषदेत सुतवाच्य

मुलनिवासी बहुजनांना राष्ट्रीय स्तरावर एकत्र यावे लागेल - कमलकांत काळे राष्ट्रीय अध्यक्ष

पिसोरेखांडच्या नवनिर्वाचित सरपंच श्रीमती लीलावती येरकळ यांचा नागवडेंकडून सन्मान