By : Polticalface Team ,26-07-2024
दौंड (प्रतिनिधी)भारतीय बौद्ध महासभा दौंड शहर शाखा वर्षावास कार्यक्रम दौंड शहराध्यक्ष आयु.बी. वाय.जगताप यांचे अध्यक्षतेखाली प्रा.डॉ .भीमराव मोरे यांचे बुद्धप्रणाली निवास येथे दि. २५.७.२०२४ रोजी सायं.६.ते ८.या वेळेत संपन्न झाला. यावेळी भगवान गौतम बुद्ध ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले सूत्तपठण आयु.श्रीधर बाळेकुंद्री (उपाध्यक्ष संस्कार )यांनी केले. प्रास्ताविक आयु.विजयराव गायकवाड यांनी केले. वर्षावास कार्यक्रमाचे उदघाटन सागरबाई ओहळ यांचे हस्ते झाले. , "वर्षावास व आषाढी पौर्णिमा" या विषयावर सरचिटणीस प्रा. डॉ. भिमराव मोरे यांनी सुंदर प्रवचन दिले. या प्रसंगी आयु.अरुण ओहळ,बी. वाय.धीवर यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी विलास कदम, सूर्यकांत जानराव, सुरेश मोरे, हरिबा काळे, सूर्यकांत कांबळे, दिलीप आढाव, गोरख घोडके, सैदाप्पा गायकवाड, राजू कांबळे, अरुण मोरे,एडवोकेट शितल मोरे ,संगीता मोरे, शिल्पा कांबळे, सीमा मोरे, लक्ष्मीबाई मोरे, सुरभी मोरे, बंटी ओहळ इ.मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयराव गायकवाड यांनी केले तर आभार बी. वाय. धीवर यांनी मानले.
वाचक क्रमांक :