By : Polticalface Team ,30-04-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता. ३० एप्रिल २०२५. यवत पोलीस स्टेशन लगत असलेल्या मांग गारुडी कुटुंबातील महिला पुरुषांना दहा ते पंधरा तरुणांनी दगडफेक करत घरात घुसून मारहाण केल्या प्रकरणी कायदेशीर कारवाई बाबत पीडित कुटुंबाकडून तक्रार करण्यात आली होती त्या अनुषंगाने यवत पोलीस स्टेशन येथे फिर्यादी विष्णू गणपत बोडके यांच्या तक्रारी वरून आरोपी १) संतोष शिंदे. २) शुभम मासुळे व इतर १० ते १२ इसम सर्व रा इंदिरा नगर यवत ता दौंड जिल्हा पुणे यांच्या विरुद्ध गु र नं ०४०२ भारतीय न्याय संहिता ( बी एन एस)२०२३ कलम १८९(२) १९१(२) १९० ११५(२) ३५१(२) ३५१(३) ३५२ अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ -- ३(१)(r) ३(१)(s) ३(२)( va) अंन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या बाबत अधिक माहिती अशी की मंगळवार दि.२९/०४/२०२५ रोजी रात्री १०:३० वाजे सुमारास पुणे–सोलापूर हायवे लगत असलेल्या अन्नपूर्णा हॉटेल परिसरात यवत मानकोबा वाडा येथील रेकॉर्डवर असलेल्या कोयता गँग टोळी आणि इंदिरा नगर येथील रेकॉर्डवर असलेल्या पिस्टल गँग टोळी यांच्यामध्ये आपसात बाचाबाची होऊन एकमेकांमध्ये हाणामारी झाली. या भांडणामध्ये मांग गारुडी कुटुंबातील मुलगा माऊली विष्णू बोडके हा असल्याचा राग मनात धरून इंदिरा नगर येथील रेकॉर्डवरील पिस्टल गँग टोळीतील १० ते १५ तरुणांनी यवत गावातील तुकाई नगर येथील गारुडी वस्तीमध्ये येऊन विष्णू गणपत बोडके व साहेबराव गणपत बोडके यांच्या घरावर दगडफेक करत जातीवाचक शिवीगाळ करत घरात घुसून घरातील महिला, पुरुष व लहान मुलांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची व हातपाय तोडण्याची धमकी दिली असल्याचे पीडितांनी सांगितले.
दगडफेकीत शेजारी राहणारे घिसाडी समाजातील संभाजी भारत पवार यांच्या डोक्याला दगड लागून ते जखमी झाले. तरीही हल्ला सुरूच होता. पोलिसांना संपर्क साधल्यावर घटनास्थळी पोलीस पोहोचले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी तरुण पळून गेले. मात्र त्यांचे हिरो कंपनीची स्प्लेंडर पल्स गाडी नं एम एच ४२ ए टी ८७१७ तसेच होंडा कंपनीची शाईन गाडी नं एम एच ४२ बी जी ६३७० या दोन दुचाकी गाड्या तेथेच टाकून निघून गेले यवत पोलिसांनी त्या ताब्यात घेतल्या आहेत.
घटना कशामुळे घडली या बाबत विचारले असता पीडितांनी सांगितले की अन्नपूर्णा हॉटेल परिसरात भांडणे झाली या बाबत आम्हाला काही कल्पना नव्हती याचा राग धरूनच आमच्या वस्तीवर हल्ला झाला. इंदिरा नगर व मानकोबा वाडा येथील टोळ्यांमध्ये पूर्वीपासून वाद असून त्यांच्या विरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
गुन्हेगार टोळ्यांवर कठोर कारवाई होऊन त्यांच्या दहशतीला आळा बसावा, अशी मागणी केली जात आहे. यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी घटनेची दखल घेतली असून, अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यानुसार कायदेशीर कारवाईची तक्रार दाखल करण्यात आली असून फिर्यादी विष्णू गणपत बोडके यांच्या तक्रारी वरून वरील आरोपी विरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे १) आरोपी संतोष शिंदे. २) शुभम मासुळे व इतर १० ते १२ तरुण सर्व रा इंदिरा नगर यवत ता दौंड जिल्हा पुणे यांच्या विरुद्ध गु र नं ०४०२ भारतीय न्याय संहिता ( बी एन एस)२०२३ कलम १८९(२) १९१(२) १९० ११५(२) ३५१(२) ३५१(३) ३५२ अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ -- ३(१)(r) ३(१)(s) ३(२)( va) अंन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार - पोलीस.हवालदार भोर मा उपविभागीय पोलिस अधिकारी बापुराव दडस सो दौंड विभाग दौंड पुढील तपास करीत आहेत
वाचक क्रमांक :