By : Polticalface Team ,09-05-2025
लिंपणगाव (प्रतिनिधी) ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर; सामाजिक कार्यकर्ते संतोष गुंड; प्रगतशील शेतकरी हनुमंत झिटे या सन्मानार्थिंचा मढेवडगाव ग्रामपंचायत कडून सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रामुख्याने पत्रकार कुरुमकर यांना दैनिक राष्ट्र सह्याद्री समूहाकडून यांना नुकताच उत्कृष्ट आदर्श ग्रामीण जिल्हास्तरीय पुरस्कार तर संतोष गुंड व प्रगतशील शेतकरी हनुमंत झिटे यांना डॉ. मनीभाई देसाई ॲवार्ड पुरस्कार प्राप्त झाल्याने या तीनही मान्यवरांचा ग्रामपंचायतकडून सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रास्ताविकामध्ये ग्रामपंचायत सदस्य नवनाथ उंडे यांनी या तीनही सत्कारमूर्तींच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करून देत जी व्यक्ती समाजामध्ये सामाजिक हित जोपासून विविध क्षेत्रात उत्कृष्ट सामाजिक बांधिलकी म्हणून काम करत असेल तर आपणही त्या व्यक्तींना आणखी बळ मिळण्यासाठी सन्मान करणे हे आपल्या आद्य कर्तव्य असल्याचे सांगून; या तीनही सत्कारमूर्तींच्या कार्यकर्तृत्वाविषयी स्तुतीसुमने वाहून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी साहेबराव मांडे यावेळी आपल्या शुभेच्छा पर म्हणाले की; पत्रकार कुरुमकर यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून एक वेगळा ठसा उमटवला आहे. त्याची दखल दैनिक राष्ट्र सह्याद्री समूहाने घेतली. ही अभिमानाची बाब आहे. तर संतोष गुंड यांनी देखील गावच्या विकासात मोठे भरीव योगदान देत आहेत. त्यांचेही कार्य समाजाभिमुख आहे. प्रगतशील शेतकरी हनुमंत झिटे यांनी देखील माळरानावर शेती फुलवून एक मोठा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. असे सांगून शुभेच्छा व्यक्त केल्या
लोकनियुक्त सरपंच प्रमोद शिंदे यावेळी म्हणाले की पत्रकार कुरुमकर यांनी तालुक्यातील रस्ते; वीज; पाणी; शेतकऱ्यांचे प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडून प्रशासनाला त्यांच्या लेखणीची दखल घ्यावी लागते. तर संतोष गुंड व हनुमंत झिटे यांचे गावच्या विकासात मोठे योगदान व मार्गदर्शन लाभत असून त्यामुळेच गावच्या विकासाला गती आल्याचे सांगितले.
याप्रसंगी गावचे सरपंच प्रमोद शिंदे; मा उपसरपंच राहुल साळवे; युवा नेते नवनाथ उंडे; लक्ष्मण मांडे; रयत शिक्षण संस्थेचे सल्लागार सदस्य स्मितल वाबळे; पंडितराव वाबळे; रयतचे सेवानिवृत्त शिक्षक बी. डी शिंदे आदी मान्यवरांनी पत्रकार कुरुमकर; संतोष गुंड; हनुमंत झिटे आदींच्या कार्यकर्तुत्वावर स्तुती सुमने वाहून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
आभार प्रदर्शनामध्ये नागवडे कारखान्याचे संचालक सुभाषराव शिंदे यावेळी म्हणाले की पत्रकार कुरुमकर आपल्या यांनी आपल्या निर्भीड लेखणीतून समाजहित डोळ्यासमोर ठेवून विविध प्रश्नावर अभ्यासपूर्ण लेखन करत आहेत मढेवडगावचा सर्वांगीण विकास होत असताना पत्रकार कुरुमकर यांनी वेळोवेळी योग्य प्रसिद्धी देऊन आपली सामाजिक बांधिलकी कायम ठेवली तर संतोष गुंड व हनुमंत झिटे यांचे देखील गावच्या विकासात मोठे योगदान लाभत आहे या तीनही मान्यवरांना पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांचा सन्मान करणे हे आपले सर्वांचे आद्य कर्तव्य असल्याचे सांगून शुभेच्छा व्यक्त केल्या
या सन्मान सोहळ्यास ग्रामपंचायत सरपंच प्रमोद शिंदे उपसरपंच राजकुमार उंडे ग्रामपंचायतचे सर्व आजी माजी सदस्य सेवा संस्थेचे चेअरमन व्हॉइस चेअरमन व आजी-माजी सदस्य; सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह ग्रामस्थ ग्रामविकास अधिकारी खाडे भाऊसाहेब उपस्थित होते.
वाचक क्रमांक :