सांगली ते अहिल्यानगर या एसटीने दौड जिल्हा पुणे येथे प्रवास दरम्यान १९ लाख ८६ हजार किंमतीचे ३२ तोळे १० हजार रोख अज्ञात चोरांनी चोरट्याने चोरुन नेले
By : Polticalface Team ,28-04-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता २८ एप्रिल २०२५ सांगली ते अहिल्यानगर या एसटीने दौड जिल्हा पुणे येथे प्रवास दरम्यान १९ लाख ८६ हजार किंमतीचे ३२ तोळे ६ ग्रँम सोन्याचे दागिने व २० भार चांदीचे दागिणे आणी १० हजार रुपये रोख रक्कम असे कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहे या बाबत दौंड पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्या विरूध्द गुन्हा रजि नं-३०६/२०२५ भा न्याय सहीता कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करणाऱ्या फिर्यादीचे नाव व पत्ता-कोमल राहुल नगरकर वय ३२ वर्षे व्यवसाय घरकाम रा.जुना बुधगाव रोड पंचशिल नगर मारुती मंदिर जवळ सांगली असे नमूद करण्यात आले आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की दिनांक २२/०४/२०२५ रोजी स.१० ते दिनांक २२/०४/२०२५ रोजीचे सायंकाळी ०७ वाजे चे सुमारास सांगली ते अहिल्या नगर या एसटीने दौड जिल्हा पुणे येथे जात असताना प्रवास करुन दौड येथील मामा सुनिल नगरकर यांचे राहते घरा पर्यत फिर्यादी व त्यांची बहीण कल्याणी आणि चुलत सासु जयश्री यांचे एकुण १९ लाख ८६ हजार रुपये किंमतीचे ३२ तोळे ६ ग्रँम सोन्याचे दागिने व २० भार चांदीचे दागिणे आणि १० हजार रुपये रोख रक्कम असे कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले असल्याचे नमूद करण्यात आले आहे म्हणुन सदर फिर्यादीने अज्ञात चोरट्या विरुद्ध कायदेशीर तक्रार केली आहे.
फिर्यादी यांची आई सुनिता रोहीदास पन्हाळकर हिची ओपन बायपास सर्जरी केली असल्यामुळे सदरची घटना ऐकुन आईला अचानक धक्का बसला त्यामुळे आम्ही सर्वजण तिचेवर उपचार करणेसाठी तिला सांगलीला घेवुन आलो व तिचेवर उपचार करुन आज रोजी सांगली शहर पोलीस ठाणेस तक्रार देणेसाठी आलो आहे. सदरचा गुन्हा सांगली शहर पोलीस स्टेशन जिल्हा सांगली गुन्हा रजि नं-०२/२०२५ भा.न्याय.सहीता कायदा कलम- ३०३(२) अन्वये सदर गुन्हा दौंड पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आला आहे. दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो स ई कदम हे पुढील तपास करीत आहेत
वाचक क्रमांक :