जमिनीच्या व्यवहारातून आर्थिक फसवणूक. एजंट पवन थोरात व गोरखनाथ तबाजी थोरात यांच्या विरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
By : Polticalface Team ,05-05-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता 05/मे 2025. दौंड तालुक्यातील मौजे गिरिम ता दौंड जिल्हा पुणे येथील जमीन खरेदी विक्री व्यवहारात फसवणूक झाल्याच्या कारणा वरून दौंड पोलीस ठाण्यात फिर्यादी सौ.पार्वती विश्वनाथ गरूडे.वय-35 वर्षे व्यवसाय भाजीपाला रा. शालीमार चौक मुन्सीपल रेल्वे एरिया दौंड ता.दौंड जि पुणे यांच्या फिर्यादी वरून आरोपी 1) पवन थोरात 2) गोरखनाथ तबाजी थोरात दोघे रा.गिरीम ता.दौंड जि पुणे यांचे विरुध्द दौंड पोलीस स्टेशन येथे गु.रजि नं 323/2025 भा.द.वि कलम 420 अंन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या बाबत अधिक माहिती अशी की सदर प्रकार घडला गिरीम ता दौंड जिल्हा पुणे गावचे हद्दीत दि.14/10/2021 ते 03/05/2025 दरम्यान जमिन खरेदी विक्री व्यवहारात 3 लाख 50 हजार रुपयाची फसवणूक झाल्या प्रकरणी दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
हकिकत- वर नमुद ता वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी यांनी एजंट पवन थोरात व त्यांचे चुलते गोरखनाथ तबाजी थोरात यांच्याकडून दिड गुठा जमीनीचे सर्व पैसे रक्कम रूपये 3 लाख 50 हजार रुपये एजंट पवन थोरात व त्याचे चुलते गोरखनाथ तबाजी थोरात यांना माझे पती विश्वनाथ गरूडे व विनोद लवटे यांच्या समक्ष व हस्त दिले व दि.14/10/2021 रोजी मा.सब रजिस्टर कार्यालय दौंड जि.पुणे या ठिकाणी खरेदी दस्त क्रमांक 3174/2021 नुसार पवन थोरात त्यांचे चुलते गोरखनाथ तबाजी थोरात यांनी फिर्यादीस करुन दिले व नंतर सदर जागेचा ताबा देवु असे सांगितले पवन थोरात त्यांचे चुलते गोरखनाथ तबाजी थोरात यांनी दाखविलेल्या जागेवर त्यांनी सांगितल्या प्रमाणे फिर्यादी यांनी ताबा घेऊन खांब रोवले. त्या नंतर 8 दिवसांनी फिर्यादी सदर जागेची पाहणी करण्या करीता गेले असता फिर्यादीने रोवलेले खांब कोणीतरी काढून तोडून फेकून दिल्याची वस्तुस्थिती त्या ठिकाणी दिसून आली. त्या बाबत आजू बाजूस चौकशी विचारणा केली असता. तेथे गोविंद भोंगळे आले व सदर खांब मीच तोडून फेकून दिल्याचे त्यांनी सांगितले व ही जागा त्याच्याचं मालकीची असल्याचे ही त्यांनी सांगितले. त्यावर फिर्यादीने सदरहू जागा गोरखनाथ तबाजी थोरात यांच्या कडून खरेदी केल्याचे गोविंद भोंगळे यांना सांगितले.
त्या नतंर मी विकत घेतलेल्या जागेची मालकी हक्क घेण्या करीता वारंवार एजंट पवन थोरात व गोरखनाथ तबाजी थोरात यांचेकडे गेले परंतु त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे देवून जमीनीचा आज तागायत ताबा ही दिला नाही व फिर्यादीने जमीन खरेदी करताना दिसले पैसे देखील एजंट पवन थोरात व गोरखनाथ तबाजी थोरात यांनी परत दिलेले नाही म्हणून फिर्यादीची खात्री झाली की वरिल इसमाने जमिनीच्या व्यवहारातून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली असल्याने फिर्यादी सौ.पार्वती विश्वनाथ गरूडे. यांच्या तक्रारी वरून एजंट 1)पवन थोरात 2) गोरखनाथ तबाजी थोरात दोघे रा.गिरीम ता.दौंड जि पुणे यांच्या विरूध्द दौंड पोलीस स्टेशन येथे गु.रजि नं 323/2025 भा.द.वि कलम 420 अंन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे नमूद करण्यात आले असून दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार पोलीस हवालदार भोसले पुढील तपास करीत आहेत
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल
कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.
वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान
बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती
दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती
श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते
संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद
पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन ------------- ह.भ. प. दंडवते महाराज
राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक
आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे
छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!
वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न
करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे
करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.