उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या घरासमोर वंचित बहुजन युवा आघाडी करणार आंदोलन- मंगलदास निकाळजे
By : Polticalface Team ,05-05-2025
जन आधार न्यूज बारामती प्रतिनिधी भीमसेन जाधव मो.9112131616 विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोणाचीही मागणी नसताना लाडकी बहीण योजना काढली या योजनेमार्फत महिलांना दरमहा 1500 देण्यात येतात अशा प्रकारच्या योजना काढल्याने साहजिकच सरकारवर आर्थिक बोजा येणार मुळातच या योजनेसंदर्भात कोणतेही प्रकारचे नियोजन केलेले नसल्याने व या योजनेसाठी एवढा मोठा निधीची तरतूद कुठून करणार याबाबतचे नियोजन शून्य असल्याने ही योजना चालवण्यासाठी सरकारला वर लोड येत आहे ही योजना चालू करताना सरकार मधील नेत्यांकडून सांगण्यात येत होते कि ही योजने चालवण्यासाठी आमच्या कडे खूप निधी आहे व तशी आम्ही तरतूद केली आहे परंतु ही योजना चालवण्यासाठी सरकार कडे निधी नसल्याचे समोर आले आहे याचे कारण इतर लोकांच्या हक्काचे निधी सरकारला वळवावे लागत आहेत. दिनांक 2 मे 2025 रोजी शासन निर्णय क्र. मवबा-2025/प्र.क्र. 83/कार्या- या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांसाठी समाज कल्याण मार्फत राबविण्यात येणार्या योजनांचा 410.30 कोटी (अक्षरी 410 कोटी तीस लाख रुपये ) इतका निधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून महिला व बाल विकास विभागास वळवला आहे. यामुळे वंचित बहुजन युवा आघाडीने सरकारचा जाहीर निषेध केला आहे. कारण अनुसूचित जाती, जमाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांच्या हक्काचा निधी, त्यांचे जीवनमान सुधारणार निधी, त्यांची दर्जा वाढवणारा निधी, शिक्षणासाठी खर्च करावयाचा निधी, अत्याचार ग्रस्त लोकांचे पुनर्वसन करणारा निधी, घरकुलासाठी वापरणारा निधी, व्यवसाय सुरू करण्यासाठीचा निधी, भूमिहीन शेतकऱ्यांसाठीचा निधी व इतर सामाजिक न्याय देण्यासाठी वापरावयाचे निधी अत्यंत चुकीच्या पद्धतीने वळवून बेकायदेशीर कृत्य केले आहे. अशाप्रकारे निधी वळवू शकत नसतानाही सामाजिक न्यायाचा निधी वळून अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांवर अन्याय केला असल्याच्या निषेधार्थ तसेच हा निधी परत करावा,
अशाप्रकारे अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांचा हक्काचा निधी वळवून नये यासाठी बजेटचा कायदा करावा
लाडक्या बहीण योजनेसाठी स्वातंत्र्य तरतूद करणे, सामाजिक न्यायाचा निधी बेकायदेशीरपणे वापरणाऱ्या जबाबदार व्यक्तींवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासंदर्भात व त्यांच्यावर कठोर कारवाई करणे या मागण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने दिनांक 08/05/2025 रोजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या सहयोग सोसायटी, बारामती येथील घरासमोर वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष, मंगलदास निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणार असल्याचे निवेदन मा.उपविभागीय अधिकारी बारामती यांना दिले आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष राज कुमार, वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे, उपाध्यक्ष गणेश थोरात, सहसचिव कृष्णा साळुंके, जितेंद्र कवडे, किशोर मोरे, सागर गवळी, मंगेश सोनवणे, जितेंद्र जगताप, शिवाजी बनसोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
पुरस्कार प्राप्त कुरुमकर; गुंड व झिटे यांचा मढेवडगाव ग्रामपंचायतकडून सन्मान
राष्ट्रवादी माजी सैनिक सेल सिंदूर ऑपरेशन साठी सज्ज - प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या घरासमोर वंचित बहुजन युवा आघाडीचे आंदोलन
एच. एस. सी. च्या उत्कृष्ट निकालाबद्दल व्यंकनाथ सेवा संस्थेकडून गुणवंतांचा सन्मान
विचाराची नशा ऐवढी वाढत गेली विचार होता महापुरुषांचा दसक्रिया विधीच केला या बहाद्दराने हयात आईवडीलांचा
यवत पोलीस साहाय्यक फोजदार पदावरून श्री सुनील बगाडे व गोविंद भोसले यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती. यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिल्या शुभेच्छा
गौण खनिजाचे उत्खनन परवाना नसताना. वाळु गौण खनिज चोरी करून वाहतूक करणारा ट्रक पोलीसांनी लिंगाळी रोडला पकडला.
बारावीच्या परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले म्हणून १७ वर्षाच्या हर्षदाने गळफास घेऊन केली आत्महत्या राहु येथील घटना.
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या घरासमोर वंचित बहुजन युवा आघाडी करणार आंदोलन- मंगलदास निकाळजे
जमिनीच्या व्यवहारातून आर्थिक फसवणूक. एजंट पवन थोरात व गोरखनाथ तबाजी थोरात यांच्या विरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
इंदिरा गांधी विद्यानिकेतन इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांची तब्बल 34 वर्षानंतर गळा भेट!
कामठी गावच्या पानंद रस्त्याची यशस्वी मोजणी , दहा ते बारा वर्षापासूनचा बंद रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार
ओम मार्शल आर्ट अँड सोशल सर्विस असोसिएशन दौंड विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय अजिंक्य स्पर्धेमध्ये घवघवीत यश
कुरकुंभ येथे कल्याण मटका जुगार चालवणाऱ्या सह लोकांन विरुद्ध गुन्हा दाखल. दौंड पोलीसांनी केली कारवाई
अखेर कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीचा मुहूर्त ठरला! ५ मे रोजी बैठकीचे आयोजन जलसंपदा विभागाचा सूत्रांची माहिती
पत्रकार कुरुमकर यांनी शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात आपल्या कर्तुत्वातून उंची वाढवली
यवत येथील मांग गारुडी कुटुंबातील महिला पुरुषांना घरात घुसून मारहाण.केल्या प्रकरणी १२ तरुणांवर (ॲट्रॉसिटी) अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल.
पत्रकार कुरुमकर यांचा माध्यमिक शिक्षक सोसायटी व तहसीलदारांकडून गौरव
सांगली ते अहिल्यानगर या एसटीने दौड जिल्हा पुणे येथे प्रवास दरम्यान १९ लाख ८६ हजार किंमतीचे ३२ तोळे १० हजार रोख अज्ञात चोरांनी चोरट्याने चोरुन नेले
कुरूमकर हे पत्रकारितेतील राजहंस - ---- शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ उंडे