श्री काळभैरवनाथांची पालखी सोहळा. हजरत बडेशावली दर्गा येथे. दसरा महोत्सव यवत ग्रामस्थांनी अंधारात सोनं (आपटा) लुटुन घेतल्या गळाभेटी.

By : Polticalface Team ,13-10-2024

श्री काळभैरवनाथांची पालखी सोहळा. हजरत बडेशावली दर्गा येथे. दसरा महोत्सव यवत ग्रामस्थांनी अंधारात सोनं (आपटा) लुटुन घेतल्या गळाभेटी.

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता १३ ऑक्टोबर २०२४ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील विजयादशमी दसरा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यवत गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाची पालखी सोहळा घेऊन मानकरी सह देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व समिती सदस्य तसेच गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने दसरा महोत्सवात सहभागी झाले होते. दरवर्षी प्रमाणे मोठ्या उत्साहात विजयादशमी दसरा महोत्सवाच्या निमित्ताने श्री काळभैरव नाथांची पालखी (विसावा स्थान) पूर्व काळापासून हजरत बडे शहावली दर्गा या ठिकाणी जागा आहे. यवत नगरीतील गावकरी या ठिकाणी श्री काळभैरव नाथांची पालखी घेऊन जातात. श्री काळभैरवनाथ व हजरत बडे शहावली बाबा या सुफी संत अवलियांची भेट होते. अशी गावकऱ्यांमध्ये धार्मिक भावना आहे. हि परंपरा पूर्व काळापासून आज पर्यंत गावकऱ्यांनी जपली आहे. या ठिकाणी दसरा महोत्सवाच्या निमित्ताने सोनं (आपटा) लुटण्याचा धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. संपूर्ण महाराष्ट्रात अशी परंपरा कुठेही दिसून येत नाही. हिंदू मुस्लिम दोन समाजातील नागरिकांचा एकोपा टिकून राहावा या उद्देशाने. हा धार्मिक कार्यक्रम व परंपरा असल्याचे बोलले जात आहे. या ठिकाणी दसरा उत्सव वर्षातून एकदा पाहवयास मिळतो मात्र या वे मुस्लिम समाजातील नागरिकांनी या उत्सवाकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून आले. श्री काळभैरवनाथाची पालखी विसावा स्थानी ठेवून आरती केली जाते. व नंतर सोनं आपटा लुटण्याचा धार्मिक कार्यक्रम केला जातो मात्र या प्रसंगी लाईट बंद असल्याने अंधारात श्री काळभैरवनाथांची आरती करण्यात आली. तसेच सोनं आपटा लुटण्याचा धार्मिक कार्यक्रम देखील अंधारात पार पडला या प्रसंगी दिलीप शेठ यादव तसेच अनेक ग्रामस्थांनी लाईट लावण्या बाबत सांगितले तरी देखील लाईट लावण्यात आली नाही. हि बाब अतिशय दुरदैवी असल्याचे गावकऱ्यांनी बोलताना सांगितले. असुन सदर प्रकारा बाबत नाराजी व्यक्त केली. या ठिकाणी मुस्लिम समाजातील मदरसा संस्थेतील विद्यार्थी मुलं निवासी राहत आहेत. मात्र गावातील मुस्लिम समाजातील एकही व्यक्ती हजरत बडे शहावली बाबा दर्गा येथे दिसुन आली नाही. हजरत बडेशावली बाबा दर्गा मुजावर फैय्याज भाई तांबोळी बोलताना म्हणाले मी लाईन चालु करुन ठेवली होती असे त्यांनी सांगितले. दसरा महोत्सव वर्षातून एकदा साजरा केला जातो या पुढे. श्री काळभैरवनाथांच्या पालखी विसावा स्थानी. हजरत बडे शहावली बाबा दर्गा या ठिकाणी गावकरी व्यवस्था करतील अशी स्पष्ट भूमिका घेतल्याने नागरिकांनमध्ये शांतता पसरली व धार्मिक कार्यक्रम आटपून घेतला. श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट समितीचे अध्यक्ष सतीश दोरगे. संपत दोरगे. अशोकराव गायकवाड. मयुर गायकवाड. चंद्रकांत दादा दोरगे. नानासाहेब दोरगे महाराज. कैलास आबा दोरगे. रघुनाथ दादा दोरगे. यवत ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच नाथा आबा दोरगे. यांनी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली दसरा उत्सवाच्या निमित्ताने यवत येथील प्रमुख मान्यवरांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शविली होती काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट समिती सदस्य तसेच माजी पंचायत समिती सदस्य कुंडलिक नाना खुटवड यवत ग्रामपंचायत सदस्य सदानंद दोरगे रमेश शेठ यादव हभप नानासाहेब दोरगे महाराज. माऊली आबा शेळके. यवत ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सुभाष यादव. सामाजिक कार्यकर्ते गणेश शेळके. आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते श्री काळभैरवनाथ पालखी मिरवणूक महालक्ष्मी माता मंदिर या ठिकाणी पोचली धार्मिक कार्यक्रम देवीची आरती करून रावण दहन करण्यात आले या प्रसंगी या प्रसंगी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. या वेळी पंचक्रोशीतील सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील तसेच यवत ग्रामस्थ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. श्री काळभैरवनाथांची पालखी सोहळ्याचे पुढे पायघड्या घालून गाव गोंधळी यांच्या पारंपारिक वाद्याच्या आणि फटाक्यांच्या धुमधडाक्यात म्हसोबा चौक येथे मानकरी व चंद्रकांत दादा दोरगे यांच्या घरी पालखी सोहळा विठ्ठल समाज भजनी मंडळातील वारकरी सांप्रदायातील नागरिकांनी भजन गाऊन दसरा महोत्सवाचा समारोप करण्यात आला. वाचक क्रमांक : Visit counter For Websites


पाटस येथील तक्षशिला बुद्ध विहारात वर्षावास समाप्ती. कोजागिरी पौर्णिमा निमीत्त सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन. तथागत गौतम बुद्ध मूर्तीची केली स्थापना.

महाराष्ट्र शासन संत सेवालाल महाराज लमाण तांडा योजनेच्या दौंड तालुका अशासकीय सदस्य पदी मिथुन राठोड यांची निवड..

मराठा सेवा संघाच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त दशरथआण्णा कांबळे यांचा मराठा मार्गदर्शक सामाजिक गौरव पुरस्काराने सन्मान....

दौंड पोलीस प्रशासनाचे जाहीर आवाहन. आदर्श आचारसंहितेचे पालन करा. पूर्वपरवानगी शिवाय कोणतेही राजकीय कार्यक्रम करू नयेत. पोलीस निरीक्षक गोपाळ पवार.

डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंतीनिमित्त विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा .

अखेर कृषी व महसूल विभागाचे अधिकारी नुकसानग्रस्त शेतकरी श्री आल्हाट यांच्या बांधावर

विजयादशमीनिमित्त सामाजिक बांधिलकी व गुणवत्तेचा सन्मान व्हावा - प्रा.गणेश करे-पाटील. रावगाव विद्यालयास यशकल्याणीकडून ६ स्मार्ट टि.व्ही.संच प्रदान..!

संजयमामा शिंदे यांच्या आमदार पदाची व्हॅलिडिटी संपली, पाच वर्षे विकासाचे नेटवर्क गायब झाल्याने मतदार आता बदल करणार : प्रवक्ते तळेकर

आजपासूनच आचारसंहिता लागणार म्हणजे नेमकं काय होणार? सर्वसामान्यांसाठी काय बदलणार?

करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी सय्यद भाई यांचे चिरंजीव जमील भाई सय्यद यांचा मराठा मित्र पुरस्कार देऊन करमाळा येथे झाला सन्मान

उजनी धरणातून सोडलेले कॅनॉलचे पाणी उद्यापासून बंद! धरणात सध्या 123 TMC पाणी; 15 जानेवारीदरम्यान धरणातून सुटणार शेतीसाठी पहिले आवर्तन

इंदापूर तालुक्यात वंचित बहुजन युवा आघाडीच्या तीन शाखांचे जल्लोषात उद्घाटन

राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हाबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ?तुतारी आणि पिपाणी मोठा गोंधळ उडणार ?

आईने कष्टाने घेऊन दिलेली गाडी चोरीला गेली “आईची शेवटची आठवण, प्लीज परत करा..” पुणेकर तरुणाची पाटी पाहून व्हाल भावुक

डोक्यात दगड घालून मित्राचा खून; इंदापूरातील घटना

बारामतीच्या टीसी कॉलेज परिसरात बेशिस्त वाहन चालकांना वाहतूक शाखेचा जोरदार दणका! 84 वाहनांवर कारवाई! पाऊण लाखांचा दंड

मोठी बातमी : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले; 20 नोव्हेंबरला मतदान 23 ला निकाल

आगामी विधानसभा निवडणुकीतून माघार नाही भाजपाची उमेदवारी मलाच मिळेल, भाजपा नेत्या सुवर्णाताई पाचपुते यांचे पत्रकार परिषदेत सुतवाच्य

मुलनिवासी बहुजनांना राष्ट्रीय स्तरावर एकत्र यावे लागेल - कमलकांत काळे राष्ट्रीय अध्यक्ष

पिसोरेखांडच्या नवनिर्वाचित सरपंच श्रीमती लीलावती येरकळ यांचा नागवडेंकडून सन्मान