उरुळी कांचन भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा अशोका विजयादशमी 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.

By : Polticalface Team ,13-10-2024

उरुळी कांचन भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा अशोका विजयादशमी 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. हवेली ता 13 ऑक्टोबर 2024 हवेली तालुक्यातील मौजे उरुळी कांचन ता हवेली जिल्हा पुणे दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा उरुळी कांचन अन्तर्गत यशोधरा सिद्धार्थ सामाजिक संस्था तसेच रमाई महिला मंडळ साई नगर तुपे वस्ती आयोजित काल शनिवारी दिनांक 12/10/24 रोजी अशोका विजयादशमी चे औचित्य साधून 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा अतिशय उत्कृष्टरित्या पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात सार्वजनिक बुद्ध वंदना घेऊन करण्यात आली, या प्रसंगी संस्थेच्या उपासिका आयुनी नीलिमाताई बाबासाहेब कांबळे व आयुनी उषाताई रमेश उबाळे यांनी उपस्थित सर्व धम्म उपासक व उपासिका यांच्याकडून 22 प्रतिज्ञा वधवुन घेतल्या. तसेच संस्थेचे अध्यक्ष केंद्रीय शिक्षक आणि बोधाचार्य आयु. बाबासाहेब मारुती कांबळे, सभासद आयु.भिमराव आडकुजी घायवन, आयु.महेश गायकवाड. आयुनी.उषाताई रमेश उबाळे, छोटीशी चीमुकली ईश्वरी भुसारे तसेच वंचित बहुजन आघाडी चे आयु. सतिशभाऊ साळवे या सर्वांनी मनोगत व्यक्त केले. तथागत गौतम बुद्धांपासुन चक्रवती सम्राट अशोक तसेच बोधिसत्व परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 साली विजयादशमीला नागपूर येथे बौद्ध धम्माचा स्वीकार करून लाखो अनुयायी बांधवांना धम्म दिक्षा देऊन येवला येथे दिलेल्या घोषणेची अंमलबजावणी केली या अनुषंगाने बौद्ध बांधवांनी वाटचाल करावी असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव आयु.कैलास पांडूरंग शिंदे यांनी केले. शेवटी सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील सर्व उपस्थीत उपासक उपासिका तसेच सर्व मान्यवरांचे आभार संस्थेचे खजिनदार आयु.संतोष पोपट मोरे यांनी केले. या वेळी उरुळी कांचन भारतीय बौद्ध महासभा, ग्रामशाखा उरुळी कांचन अन्तर्गत यशोधरा सिद्धार्थ सामाजिक संस्था तसेच रमाई महिला मंडळ साई नगर तुपे वस्ती येथील अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाचक क्रमांक : Visit counter For Websites


पाटस येथील तक्षशिला बुद्ध विहारात वर्षावास समाप्ती. कोजागिरी पौर्णिमा निमीत्त सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन. तथागत गौतम बुद्ध मूर्तीची केली स्थापना.

महाराष्ट्र शासन संत सेवालाल महाराज लमाण तांडा योजनेच्या दौंड तालुका अशासकीय सदस्य पदी मिथुन राठोड यांची निवड..

मराठा सेवा संघाच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त दशरथआण्णा कांबळे यांचा मराठा मार्गदर्शक सामाजिक गौरव पुरस्काराने सन्मान....

दौंड पोलीस प्रशासनाचे जाहीर आवाहन. आदर्श आचारसंहितेचे पालन करा. पूर्वपरवानगी शिवाय कोणतेही राजकीय कार्यक्रम करू नयेत. पोलीस निरीक्षक गोपाळ पवार.

डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंतीनिमित्त विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा .

अखेर कृषी व महसूल विभागाचे अधिकारी नुकसानग्रस्त शेतकरी श्री आल्हाट यांच्या बांधावर

विजयादशमीनिमित्त सामाजिक बांधिलकी व गुणवत्तेचा सन्मान व्हावा - प्रा.गणेश करे-पाटील. रावगाव विद्यालयास यशकल्याणीकडून ६ स्मार्ट टि.व्ही.संच प्रदान..!

संजयमामा शिंदे यांच्या आमदार पदाची व्हॅलिडिटी संपली, पाच वर्षे विकासाचे नेटवर्क गायब झाल्याने मतदार आता बदल करणार : प्रवक्ते तळेकर

आजपासूनच आचारसंहिता लागणार म्हणजे नेमकं काय होणार? सर्वसामान्यांसाठी काय बदलणार?

करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी सय्यद भाई यांचे चिरंजीव जमील भाई सय्यद यांचा मराठा मित्र पुरस्कार देऊन करमाळा येथे झाला सन्मान

उजनी धरणातून सोडलेले कॅनॉलचे पाणी उद्यापासून बंद! धरणात सध्या 123 TMC पाणी; 15 जानेवारीदरम्यान धरणातून सुटणार शेतीसाठी पहिले आवर्तन

इंदापूर तालुक्यात वंचित बहुजन युवा आघाडीच्या तीन शाखांचे जल्लोषात उद्घाटन

राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हाबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ?तुतारी आणि पिपाणी मोठा गोंधळ उडणार ?

आईने कष्टाने घेऊन दिलेली गाडी चोरीला गेली “आईची शेवटची आठवण, प्लीज परत करा..” पुणेकर तरुणाची पाटी पाहून व्हाल भावुक

डोक्यात दगड घालून मित्राचा खून; इंदापूरातील घटना

बारामतीच्या टीसी कॉलेज परिसरात बेशिस्त वाहन चालकांना वाहतूक शाखेचा जोरदार दणका! 84 वाहनांवर कारवाई! पाऊण लाखांचा दंड

मोठी बातमी : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले; 20 नोव्हेंबरला मतदान 23 ला निकाल

आगामी विधानसभा निवडणुकीतून माघार नाही भाजपाची उमेदवारी मलाच मिळेल, भाजपा नेत्या सुवर्णाताई पाचपुते यांचे पत्रकार परिषदेत सुतवाच्य

मुलनिवासी बहुजनांना राष्ट्रीय स्तरावर एकत्र यावे लागेल - कमलकांत काळे राष्ट्रीय अध्यक्ष

पिसोरेखांडच्या नवनिर्वाचित सरपंच श्रीमती लीलावती येरकळ यांचा नागवडेंकडून सन्मान