By : Polticalface Team ,11-04-2025
लिंपणगाव ( प्रतिनिधी) मराठी; हिंदी रीमिक्स मराठी लोकगीते; देशभक्तीपर गीते; कोळी गीत; शेतकरी गीत; मराठमोळी लावणी; अंधश्रद्धा निर्मूलन वरील गाणी अशा विविध संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या सादरीकरणासह जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीगोंदा शुगर येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. जिल्हा परिषद श्रीगोंदा शुगर या शाळेत वर्षभर नियमितपणे विविध उपक्रम राबविले जात असतात. या ठिकाणी राबविलेल्या प्रत्येक उपक्रमामध्ये विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त असा सहभाग असतो.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या मा सौ प्रतिभाताई पाचपुते , सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विठ्ठलबापू जंगले व लिंपणगावच्या सरपंच शोभाताई कोकाटे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमासाठी काष्टी बीटचे जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मा श्री निळकंठ बोरुडे साहेब व श्रीगोंदा बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री सिताराम भुजबळ साहेब उपस्थित होते .यावेळी मा. प्रतिभाताई पाचपुते व मा. विठ्ठल बापू जंगले यांनी विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या . यावेळी बोरुडे साहेब यांनी विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन खूप गरजेचे आहे. यातून मुलांच्या विविध कलांचा विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी शेतकरी नेते अनिलमामा घनवट ग्रामपंचायत सदस्य शिल्पाताई गायकवाड माजी सरपंच प्रेमराज धस शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीपशेठ कोकाटे डॉ दत्तात्रय गायकवाड शिक्षण तज्ञ श्री सुरेश पवार एसएमसी उपाध्यक्ष आरती वाघ ,दीपक दांडगे, संदीप जाधव, सुभाष कांबळे ,तसलीम शेख, सचिन गोंटे, मधुकर काळाणे, शशिकांत कोकाटे निलेश जगताप शैलजा शिंदे गंगा कांबळे सर्व माता पालक व शिक्षक पालक समित्यांचे सर्व सदस्य श्रीगोंदा फॅक्टरी परिसरातील सर्व पालक ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक व सर्व तरुण मंडळ आणि सर्व प्रतिष्ठानचे सर्व सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी इब्टा संघटनेचे राज्याध्यक्ष सन्माननीय श्री उत्तरेश्वर मोहोळकर सर शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बबनदादा गाडेकर सर रमेश सोनवणे सर शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सन्माननीय श्री संतोष गायकवाड सर विकास मंडळाचे गणेश गायकवाड सर तालुक्यातील अनेक ज्येष्ठ शिक्षक नेते व शिक्षक मित्र मंडळी कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी व पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी शिक्षक नेते श्री विजयकुमार लंके सर जोशीवस्ती शाळेचे शिक्षक श्री बन्यामीन पवार सर व सागर कसबे सर यांनी परिश्रम घेतले.
वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्रीमती पद्मा शिर्के पाचपुते मॅडम तसेच शिक्षिका डोंगरे मॅडम गवळी मॅडम पाचांगणे मॅडम पऱ्हे मॅडम यांनी केले .शिक्षक संदीप हिरवे सर व रवींद्र होले सर यांनी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले . संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य तसेच सर्व पालक यांनी खूप खूप सहकार्य केले.सदाबहार गाण्यांमुळे कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा झाला. उपक्रमशील शाळा श्रीगोंदा शुगर विविध कार्यक्रम राबवत असल्यामुळे सर्व पालकांनी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी भरभरून सहकार्य केले. .केंद्रप्रमुख श्रीमती अलका भालेकर मॅडम ,काष्टी बीटचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी निळकंठ बोरुडे , श्रीगोंदा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा श्री सत्यजित मच्छिंद्र साहेब यांनी यावेळी वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
वाचक क्रमांक :