By : Polticalface Team ,25-07-2024
कडेठाण ते वरवंड डांबरी रस्ता फोडला या बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेण्यात आली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला असता. ठेकेदार म्हणतात परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. या बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख अधिकारी मा माळशिकरे यांच्याशी संपर्क साधला असता. कडेठाण ग्रामसेवक आणि दौंड पंचायत समितीचे बीडीओ यांना आजच पत्र देऊन टाका असे त्यांनी बोलताना सांगितले.सदर ठेकेदार यांनी ड्रेनेज कामासाठी फोडण्यात आलेल्या डांबरी रस्त्यावर डांबरीकरण करुण देतील का ? शाळेची भिंत कोसळल्यास बांधून देतील का ? अशी चर्चा नागरिकांनमध्ये केला जात आहे. ठेकेदारांच्या आडमुठेपणामुळे कडेठाण डांबरी रस्त्यांची लागली वाट. ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष नागरिकांच्या पैशाचा चुराडा. ठेकेदार डांबरीकरण करुन देणार का ?
गावातील डांबरी रस्ता व शाळेची संरक्षण भिंत पोखरुन ड्रेनिज लाईनचे निकृष्ट दर्जाचे व कमकुवत काम केले जात आहे गावातील शाळेची सिमा भिंत सदर कामामुळे कमकुवत होऊन कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या बाबत बांधकाम विभाग प्रमुख अधिकारी यांनी लक्ष घालून योग्य ती कारवाई करण्यात यावी. अशी मागणी कडेठाण समस्त ग्रामस्थांकडून केली जात आहे. तर ठेकेदारांच्या आडमुठेपणामुळे कडेठाण येथील डांबरी रस्त्यांची वाट लागली आहे. तसेच ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या पैशाचा चुराडा केला जात आहे. हि मोठी शोकांतिका असल्याचे नागरिकांनमध्ये बोलले जात असुन नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
वाचक क्रमांक :