तीन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. पती पत्नीला मारहाण करून १ लाख ८८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेले. देऊळगाव राजे येथील घटना

By : Polticalface Team ,09-07-2025

तीन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. पती पत्नीला मारहाण करून १ लाख ८८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेले. देऊळगाव राजे येथील घटना दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता ०९ जुलै २०२५ दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे देऊळगाव राजे ता दौंड जिल्हा पुणे येथील पोपट आप्पासाहेब अवचर यांच्या घराचे कडी कोयंडा तोंडून तीन चोरट्यांनी रात्री ११:४५ वाजे सुमारास घरात प्रवेश केला.पोपट आप्पासाहेब अवचर व त्यांच्या पत्नीला जबर मारहाण करून दुखापत केली व १ लाख ८८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने सह रोख रक्कम तीन अनोळखी चोरट्यांनी चोरुन नेले ही घटना देऊळगाव राजे ता दौंड जिल्हा पुणे दौंड पोलीस स्टेशन हद्दीत घडल्याने ग्रामीण पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे फिर्यादी-पोपट अप्पासाहेब अवचर.वय -७५ वर्षे व्यवसाय-शेती, रा.देऊळगाव राजे ता.दौंड जि पुणे यांच्या तक्रारी वरून दौंड पोलीस स्टेशन येथे अनोळखी तीन चोरट्यांन विरुद्ध गुन्हा रजि नं 456/2025 भा.न्या.संहिता कलम 309(6) 305, 331(4) 351(2) 352 अंन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली या बाबत अधिक माहिती अशी की दि 07/07/2025 रोजी रात्रौ 11.45 वाजे सुमारास फिर्यादी व त्यांच्या पत्नी नंदा आमचे राहते घरामध्ये मौजे देऊळगाव राजे ता.दौंड जि पुणे येथे झोपलेलो असताना तीन अनोळखी इसमांनी घराच्या दरावाजाचा कोंयडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. पत्नी नंदा व फियादीस मारहाण करून दुखापत करुन अंगावरील व पेटीतील सोन्याचे दागिने व रोख रक्कम जबरीने चोरी करून घेवून गेले असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे हि घटना दि 07/07/2025 रोजी रात्रौ 11.45 वाजे सुमारास मौजे देऊळगाव राजे ता.दौंड जि पुणे गावचे हद्दीत फिर्यादीचे राहते घरी घडली असून घरातील चोरीस गेलेल्या किंमती मुद्दे मालाचे वर्णान खालील प्रमाणे आहे 1) 5 हजार रुपये किंमतीचे पायातील दोन चांदीचे जोडवे. 2) 25 हजार रुपये किंमतीचे कानातील दोन सोन्याचे कर्णफुले. 3) 50 हजार रूपये किंमतीचे गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र त्यात अंदाजे 50 मणी व दोन पळ्या. 4) 3 हजार रूपये रोख रक्कम त्यामध्ये 100 200 500 रूपये दराच्या भारतीय चलनातील नोंटा. तसेच अनोळखी तीन चोरट्यांनी पत्नीच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतल्या नतंर चोरट्यांनी घरातील पेटीत ठेवलेले पत्नीचे सोन्याचे दागिने काढून घेतले 5)1 लाख रूपये किंमतीचे 20 ग्रँम वजनाचे सोन्याचा गंठण. 6) 5 हजार रूपये रोख रक्कम त्यामध्ये 100 200 500 रूपये दराच्या भारतीय चलनातील नोंटा असे एकूण 1 लाख 88 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम बळजबरीने दमदाटी करून पोपट आप्पासाहेब अवचर व त्यांच्या पत्नीस मारहाण करून जबरीने चोरी करणारे अनोळखी तीन इसम पुन्हा पाहिल्यास मी त्यांना ओळखीन. असे फिर्यादीत नमूद करण्यात आले असून अनोळखी तीन इसमा विरूध्द फिर्याद आहे. दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार- पोलीस हवालदार गायकवाड. पोलीस स. ई. उगले पुढील तपास करीत आहेत
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

टाकळी लोणार जि.प.प्रा.शाळेतील आदित्य मोरे या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता यादीत निवड

टाकळी लोणार जि.प.प्रा.शाळेतील आदित्य मोरे या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता यादीत निवड

नवरा बायकोच्या भांडणात गेला चिमुकल्याचा जीव. आरोपी पती पत्नीवर यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल. आंबेगाव येथील घटना.

तीन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. पती पत्नीला मारहाण करून १ लाख ८८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेले. देऊळगाव राजे येथील घटना

शेळ्या चोरणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून गाडी थांबवली. दोन इसम आंधारामध्ये पळून गेले. एकास दौंड पोलीसांनी पकडले. तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.

श्रीगोंद्यात मोहरम उत्सव उत्साहात साजरा

अहिल्यानगर जिल्हा व प्रत्येक तालुक्यातील शिवपानंद शेख रस्ते प्रलंबित प्रकरणे जलद गतीने निकाली काढावीत , राज्य शिवपानंद शेत रस्ते चळवळीचे समन्वयक दादासाहेब जंगले यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

स्वामी चिंचोलीच्या घटनेतील त्या दोन संशयित नराधमांना पोलिसांनी घेतले ताब्यात

वरुणराजाच्या हजेरीत नागवडे स्कूल ची बालदिंडी उत्साहात संपन्न. बालदिंडी चे विक्रमी २५ वे वर्ष.

शासनाने १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन आदेशाची अंमलबजावणीसाठी विशेष बाब म्हणून निधीची तरतूद करून दयावी. _जयवंत भाबड

शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्याय लढ्याला यश – औरंगाबाद उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

स्वामी चिंचोली येथे लूट व अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीचा रेखाचित्र जारी आरोपीचा शोध सुरू

करमाळा येथील मुस्लिम समाजाने केले इंदोर येथील पालखीचे स्वागत हिंदू मुस्लिम ऐक्याचे झाले आगळे वेगळे दर्शन

मिशन हायस्कूल मैदानावर बारामतीकरांना पाहायला मिळणार लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट

अनुसूचित जाती-जमाती आयोगाचा महत्वपूर्ण आदेश: बारामतीतील पथविक्रेत्यांवर पुढील आदेश येईपर्यंत कारवाई करू नये

आमदार राहुल कुल यांची विधानसभेत मागणी

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू