By : Polticalface Team ,2025-07-05
जन आधार न्युज भिमसेन जाधव पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणात अखेर न्यायाच्या दिशेने मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. औरंगाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणातील संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. ही केवळ एका आईच्या आक्रोशाची, तर दुसरीकडे एका सामाजिक लढ्याची जिद्दीची विजयगाथा आहे.
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आई विजयाताई सूर्यवंशी यांनी न्यायासाठी अविरत संघर्ष केला. त्यांच्यासोबत या लढ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी खांद्याला खांदा लावून साथ दिली. त्यांनी या प्रकरणात कायदेशीर मार्गाने न्यायालयीन लढा उभारला आणि अखेर उच्च न्यायालयाने हा निर्णय देत सर्वसामान्य माणसाच्या आवाजाला मान्यता दिली.
या निकालामुळे आता संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार असून, पोलीस कोठडीतील अन्यायकारक मृत्यूप्रकरणी जवाबदारी निश्चित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हा निर्णय न्याय व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास वाढवणारा ठरतो. बाळासाहेब आंबेडकर यांचे या लढ्यातील योगदान, त्यांच्या न थकणाऱ्या प्रयत्नांमुळे अनेक दबलेल्या, अन्याय सहन करत असलेल्या कुटुंबांना नवी आशा आणि दिशा मिळणार आहे.
शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही, त्यांच्या आईच्या डोळ्यांतील अश्रूंना आता थोडाफार दिलासा मिळाला आहे. हा लढा केवळ एका माणसाच्या न्यायासाठी नव्हता, तर संपूर्ण व्यवस्थेला जबाबदार बनवण्यासाठी होता – आणि या लढ्याला मिळालेले हे यश संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
न्याय मिळू शकतो, जर संघर्ष जिद्दीने आणि एकजुटीने केला तर...!
हे फक्त श्रध्येय ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून शक्य झालं आहे....धन्यवाद साहेब
वाचक क्रमांक :