नवरा बायकोच्या भांडणात गेला चिमुकल्याचा जीव. आरोपी पती पत्नीवर यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल. आंबेगाव येथील घटना.
By : Polticalface Team ,11-07-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १० जुलै २०२५ दौंड तालुका यवत पोलीस स्टेशन हद्दीतील (केडगाव) मौजे आंबेगाव पुनर्वसन ता दौंड जिल्हा पुणे येथील आरोपी 1) सौ.पंल्लवी नितीन मेंगावडे 2) नितीन अजिनाथ मेंगावडे दोन्ही रा.आंबेगाव पुनर्वसन ता.दौंड जि.पुणे या नवरा बायकोचे भांडण सोडवण्यासाठी (भावजय ) सौ.भाग्यश्री सचिन मेंगावडे याचा लहान मुलगा चि.अवधूत सचिन मेंगावडे वय 11 महिने यास स्वतः चे कडेवर घेऊन दोन्ही आरोपी यांची भांडणे सोडविण्यासाठी त्यांचे राहते घरात गेल्या असता नवरा बायकोचे जोरदार भांडणात एकमेकांना मारहाण करत असताना यातील आरोपी नं.१ यांनी आरोपी नं 2 यांना त्यांचे हातातील त्रिशुल फेकून मारला मात्र भांडण सोडवण्यासाठी आलेली (भावजय) सौ.भाग्यश्री सचिन मेंगावडे यांच्या कडेवर असलेला लहान मुलगा चि.अवधूत सचिन मेंगावडे वय 11 महिने यांच्या डोक्यात त्रिशुल लागुन गंभीर दुखापत होऊन त्याचा जीव गेला हि घटना दि १०/०७/२०२५ रोजी सकाळी 10.वाजे सुमारास मौजे आंबेगाव पुनर्वसन ता. दौंड यवत पोलीस स्टेशन हद्दीत घडली असल्याची माहिती यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली.
फिर्यादी सौ.भाग्यश्री सचिन मेंगावडे वय 33 वर्षे व्यवसाय घरकाम रा.आंबेगाव पुनर्वसन ता.दौंड जिल्हा पुणे यांच्या फिर्यादीवरून यवत पोलीस स्टेशन येथे गु.र.नं 581/2025 बी. एन.एस.कलम 105 238 3(5) प्रमाणे आरोपी 1) सौ.पंल्लवी नितीन मॅगावडे, 2) नितीन अजिनाथ मॅगावडे दोन्ही रा.आंबेगाव पुनर्वसन ता.दौंड जि.पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
वर नमुद केले तारखेस वेळी व ठिकाणी यातील आरोपी नं 1 व 2 हे नात्याने पत्नी व पती आहे. तसेच फिर्यादी या आरोपी यांची नात्याने जाऊ व भावजय असून यातील आरोपी यांची त्यांचे राहते घरामध्ये भांडणे चालु असताना यातील फिर्यादी या त्यांचा लहान मुलगा चि.अवधूत सचिन मेंगावडे वय 11 महिने यास स्वतः चे कडेवर घेऊन त्या दोन्ही आरोपी यांची भांडणे सोडविण्यासाठी त्यांचे राहते घरात गेल्या असता यातील आरोपी नं 1 यांनी आरोपी नं 2 यांना त्यांचे हातातील त्रिशुल फेकून मारल्याने त्यात कोणाचा तरी जिव जाईल हे माहित असतानाही तो त्रिशुल हा फिर्यादी यांचे कडेवर असलेल्या त्यांचा लहान मुलगा चि.अवधून याचे डोक्यात डावे बाजुला लागुन त्यामध्ये तो जखमी होवुन मयत झाला असून यातील आरोपी यांनी घटनास्थळावर पडलेले रक्त व त्रिशुल कशानेतरी साफसफाई करुन पुरावा नष्ट केला आहे असे फिर्यादीत नमूद करण्यात आली आहे वगैरे फिर्यादीचे मजकुरा वरुन रजि दाखल करण्यात आला आहे यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार पोलीस हवालदार भगत. अंमलदार पोसई एम.ई.मेतलवाड पुढील तपास करीत आहेत
वाचक क्रमांक :