By : Polticalface Team ,2025-07-06
श्रीगोंदा : मोहरम पर्वात ताजिया स्थापनेची परंपरा आहे. श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा श्रीमंत मालोजीराजे भोसले यांचे गुरू सुफी संत शेख महंमद बाबा दर्गाह येथे पारंपारीक रुढी परंपरेने चालत आलेल्या ताजिया स्थापनेची परंपरा शेख महंमद बाबा यांच्या वंशजांनी जतन करत कायम ठेवत सालाबाद प्रमाणे चालु वर्षी दि. २७ जुन २०२५ रोजी शेख महंमद बाबा दर्गाह मध्ये पारंपारिक पद्धती नुसार ताबुत (ताजीया) ची स्थापना करण्यात आली होती. तसेच श्रीगोदा शहरात जावेद फ कीर, राजु मनियार, बाळासाहेब गोरे, बादशहा मालजप्ते, महंमद शेख, डॉ. बन्सीभाई मनियार आदिसह श्रीगोंदा तालुक्यात अनेक ठिकाणी ताजिया व सवारी, पंजाची स्थापना करण्यात आली होती.
शेख मोहम्मद बाबा दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष, वंशज, दैनिक सिटीझन संपादक अमीनभाई शेख, बंडूभाई शेख, अली शेख, अजीज शेख, राजू शेख, चांद शेख, फारूख शेख, सोहेल शेख, तौसीब शेख, रेहान शेख, शाहरुख शेख, शाहिद शेख,फरहान शेख यांच्या हस्ते सायंकाळी विधीवत धार्मिक पूजा करून.६ जुलै रोजी भाविक भक्तांच्या उपस्थितीत शहरातून वाद्य वाजवत मिरवणुकीने शहरातील पंचायत समिती वसाहतीतील विहिरीत ताबुताचे विसर्जन करण्यात आले.
यावेळी पो.नि.किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
मंगळवार दि.०८ जुलै रोजी (तिजायत) दिवशी शेख महंमद बाबा दरबारात खिचाड्याचा महाप्रसादाचे आयोजन करण्यातआले आहे. या महाप्रसादाचा भावीक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.