मिशन हायस्कूल मैदानावर बारामतीकरांना पाहायला मिळणार लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट
By : Polticalface Team ,02-07-2025
बारामती/प्रतिनिधी : जन आधार भीमसेन जाधव डी.जे.अम्युजमेंट प्रस्तुत महाराष्ट्रात प्रथमच बारामतीमध्ये लंडन ब्रिज,युरोपियन स्ट्रीट एक्झीबीशन भरविण्यात आले आहे. दरवर्षी नवनवीन संकल्पना घेऊन येणाऱ्या डी.जे.अँम्युझमेंटने यावर्षी बारामतीकरांना आता एक नवी नगरी घेऊन आले आहेत ज्यामध्ये लंडनचा ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट हे हुबेहूब चित्रांच्या माध्यमातून पहावयास मिळणार आहे.आणि लंडन ब्रीज वरून जाण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथील मिशन हायस्कूल मैदानावर ही पर्वणी बारामतीकरांना
पाहण्यास मिळणार आहे.अशी माहिती जयप्रकाश, जयराज आणि रवींद्रनाथ,रवी नायर,हेमंत शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याचे उद्घाटन ज्येष्ठ नगरसेवक श्री किरण दादा गुजर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र आबा बनकर,मा. उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे,नगरसेवक सौ सविता जाधव द कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ इन वेस्टर्न इन इंडिया चे अध्यक्ष श्री सुजित जाधव, सचिव डॉक्टर रॉबर्ट गायकवाड आदी उपस्थित होते. शुक्रवार २७ जून रोजी सायंकाळी ५ वाजता उद्घाटन झाले.याठिकाणी उभा करण्यात आलेला लंडन ब्रीज हा १८० फुटाचा आहे.याची उंची ४५ फूट आहे तर रुंदी १५ फूट आहे.याचबरोबर चित्रांच्या माध्यमातून विद्युत रोषणाई करून युरोप सिटी उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
याठिकाणी लहान मुले ते सर्व वयोगटातील लोक धमाल मस्ती आणि मनोरंजन करणार आहेत.जायंट व्हील, कोलंबस, ड्रॅगनट्रेन, ब्रेक डान्स,मोठा पाळणा इत्यादींमध्ये आनंदाने राइड करू शकणार आहेत.तर मुलांसाठी पेडलबोट, जंपिंग, मिनी ट्रेन इत्यादी अनेक मनोरंजक राइड्स आहेत. घरगुती वस्तू, क्रीडा उपकरणे, कूलिंग भांडी, मुलांसाठी खेळणी आणि तयार कपडे हे सर्व एकाच छताखाली पाहण्याची आणि खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळाली आहे.शिवाय पुस्तकांचाही स्टॉल आहे ज्याठिकाणी डिस्काउंट मध्ये पुस्तके खरेदी करता येणार आहेत.याचबरोबर स्वादिष्ट खाद्यपदार्थ, स्नॅक्स, पॉप-कॉर्न, कॉटन कँडी, सोलापुरी, पाणीपुरी, चाट, उटीचिल्ली बज्जी, कूलड्रिंक्स, आईस्क्रीम, चिल्ली गोबि मिरची भजी खाण्यास मिळणार आहेत.शिवाय सेल्फीही काढता येणार आहे.२५ जून ते ८ ऑगस्ट पर्यंत हे प्रदेशन सायंकाळी ५ ते १० या वेळेत सुरू राहणार आहे.बारामतीमध्ये प्रथमच आलेल्या या नगरीस बारामतीकरांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
लंडन ब्रीज विषयी माहिती
" लंडन ब्रिज " हे नाव रोमन काळापासून लंडन शहर आणि मध्य लंडनमधील साउथवार्क या दरम्यान टेम्स नदीवर पसरलेल्या अनेक ऐतिहासिक क्रॉसिंगचा संदर्भ देते . सध्याचे क्रॉसिंग, जे १९७३ मध्ये वाहतुकीसाठी खुले झाले, हा काँक्रिट आणि स्टीलपासून बनलेला बॉक्स गर्डर पूल आहे. याने १९ व्या शतकातील दगडी कमानीच्या पुलाची जागा घेतली, ज्याने ६०० वर्ष जुन्या दगडाने बांधलेल्या मध्ययुगीन संरचनेची जागा घेतली. रस्त्याच्या व्यतिरिक्त, त्याच्या बऱ्याच इतिहासासाठी, विस्तृत मध्ययुगीन पुलाने घरे आणि व्यवसायांच्या विस्तृत बांधलेल्या क्षेत्रास समर्थन दिले, शहराच्या ब्रिज वॉर्डचा एक भाग आणि साउथवार्कमधील दक्षिणेकडील टोकाला मोठ्या दगडी सिटी गेटवेने संरक्षित केले. मध्ययुगीन पुलाच्या अगोदर लाकूड पुलांच्या एकापाठोपाठ एक होते, ज्यापैकी पहिला लंडनच्या रोमन संस्थापकांनी ( लंडिनियम बांधला होता
उरल पर्वतरांगा, कास्पियन समुद्र व कॉकासस प्रदेश हे साधारणपणे युरोप व आशियाच्या भौगोलिक विभाजनासाठी वापरले जातात. क्षेत्रफळाच्या दृष्टीने युरोप हा जगातील दुसरा सर्वात लहान तर लोकसंख्येच्या दृष्टीने हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा खंड आहे. रशिया हा युरोपातील सर्वात मोठा देश तर व्हॅटिकन सिटी हा सर्वात लहान देश आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.