By : Polticalface Team ,25-07-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी) - .३ वर्षाच्या बालकापासून २५ वर्षाच्या युवक-युवती करिता संस्कारक्षम वयात त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत ते उद्याचे आदर्श चारित्र्य संपन्न नागरिक बनावेत यासाठी स्काऊट चळवळ जगभर कार्यरत आहे, असे गौरवोद्गार अहमदनगर भारत स्काऊटस् आणि गाईडस् अहमदनगरचे जिल्हा संघटन आयुक्त अरुण पेशकार यांनी केले.
शिक्षण विभाग,जिल्हा परिषद,अ.नगर व शिक्षण विभाग,पंचायत समिती,श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर भारत स्काऊटस् आणि गाईडस् अहमदनगर यांचे वतीने तालुकास्तरीय सन २०२४-२५ करिता कब-बुलबुल,स्काऊट-गाईड,रोव्हर-रेंजर पथक नोंदणी वर्गाचे आयोजन महादजी शिंदे विद्यालयात करण्यात आले होते.
पथक नोंदणी वर्गाची सुरुवात स्काऊट प्रार्थनेने झाली. त्यानंतर प्रमुख मान्यवरांचे हस्ते स्काऊट चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल व रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.
जिल्हा संघटन आयुक्त (गाईड) सोनाक्षी तेलंगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना सांगितले की,१९०७ साली सुरु लॉर्ड बेड्न पॉवेल यांनी सुरु केलेली स्काऊट-गाईड ही जागतिक चळवळ आज २०० पेक्षा जास्त देशांमध्ये ४ कोटीहून अधिक स्काऊट-गाईड यात कार्यरत आहे.
विद्यालयातील कर्मवीर भाऊराव पाटील स्काऊट पथकातील तृतीय सोपान पूर्ण केलेल्या - आर्यन वाल्मिक आवचर, शिवम मनोहर माने, आर्यन दिपक जगताप, तोहिद असलम पठाण, सिद्धार्थ शांताराम थोरात, प्रतिक कैलास जगताप, अमित संजय खेडकर, सम्राट शरद घोडके, आदित्य दिगांबर गुंजाळ, जैद आरिफ जकाते, राजहंस हृदय घोडके यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले व राज्य पुरस्कार चाचणी शिबिरास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महादजी शिंदे विद्यालयाचे प्राचार्य दिलीप भुजबळ यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा, सांस्कृतिक आदान प्रदान, ऐतिहासिक व मूल्याधिष्ठित प्रणालीसाठी सर्वांगीण व्यक्तिगत विकास घडविण्याकरिता शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असणारी व तिच्या मुलभूत तत्त्वांवर आधारलेली एक वैशिष्ट्यपूर्ण चळवळ आहे. तसेच त्यांनी विद्यालयात चालू असलेल्या उपक्रमाची माहिती दिली.
या पथक नोंदणीसाठी पूर्ण तालुक्यातील प्राथमिक-माध्यमिक शाळामधील स्काऊट मास्टर व गाईड कॅप्टन मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी श्रीगोंदा पंचायत समितीचे शिक्षण विस्ताराधिकारी सीताराम भुजबळ, सहाय्यक आयुक्त गीता चौधरी,अ.नगर भारत स्काऊट गाईडचे संजय शिंदे,रमेश वारे,विकास रत्नपारखे,विद्यालयाचे पर्यवेक्षक भाऊ गदादे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्काऊट मास्टर विकास लोखंडे यांनी केले.आभार स्काऊट तालुका समन्वयक जावेद अत्तार यांनी मानले.
वाचक क्रमांक :