देऊळगाव गाडा येथील सरपंचासह चार लोकांन विरुद्ध. अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल
By : Polticalface Team ,25-07-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता २५ जुलै २०२४ दौंड तालुक्यातील मौजे देऊळगाव गाडा ता दौंड जिल्हा पुणे येथील ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच 1) सौ. विजया सोमनाथ बारवकर, 2) सोमनाथ शिवाजी बारवकर, 3) जालींदर सखाराम बारवकर, 4) ज्ञानेश्वर आबासाहेब वाघापुरे सर्व रा. देऊळगाव गाडा ता. दौंड जि. पुणे याचे विरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्याची माहिती यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली. फिर्यादी नवनाथ साहेबराव मोरे वयः 47 वर्षे व्यवसायः किराणा दुकान (अपंग) जात-हिंदू महार रा.देऊळगाव गाडा ता. दौंड जि.पुणे यांच्या तक्रारी वरून दि 22/07/2024 रोजी यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत अधिक माहिती अशी की दि.24/06/2024 रोजी मौजे देऊळगाव गाडा ग्रामपंचायतीची मासिक सभा असल्याने विदयमान सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य मासिक सभेसाठी उपस्थित होते. त्या वेळी फिर्यादी अपंग असल्याने ग्रामपंचायत कडून व्हिल चेअर मिळण्या बाबत मागणी केली असता. तेथे उपस्थित असलेल्या ग्रामपंचायत सदस्य यांनी फिर्यादी नवनाथ साहेबराव मोरे यांना व्हिल चेअर देणे बाबत समंती दर्शवली. परंतु विदयमान सरपंच सौ. विजया सोमनाथ बारवकर यांनी तसेच त्यांचे पती सोमनाथ बारवकर यांनी फिर्यादी व्हिल चेअर देण्यास नकार दिला. मासिक सभा संपल्या नंतर विदयमान सरपंच सौ.विजया सोमनाथ बारवकर व त्यांचे पती सोमनाथ बारवकर हे त्यांचे घराकडे जाताना फिर्यादी त्यांच्या दुकानांमध्ये असताना जवळ आले व म्हणाले तुमची मांगा महारांची लायकी नाही ग्रामपंचायत मध्ये येण्याची व निर्लज्या सारखे काही मागणी करण्याची असे म्हणुन फिर्यादीच्या घरा समोर जातिवाचक शिवीगाळ करत बोलून अपमान करून निघुन गेले. दुसरे दुसऱ्या दिवशी दि.25/06/2024 रोजी दुपारी 12/49 वा चे सुमारास मी घरी असताना ग्रामपंचायत देऊळगाव गाडा या व्हॉटसअप ग्रुप वरती सोमनाथ बारवकर याने मेसेज केला. की तुम्हा माहारा मांगची लायकी नसलेल्यानी चार वर्षाचा ग्रामपंचायत कर भरता येत नाही. त्यांनी आमचे विषयी व ग्रामपंचायत विषयी बोलणे किती निर्लज्जपणाचे आहे. या वरून त्यांची लायकी काय आहे. हे सर्वाना कळले असेल ज्याची लायकी नाही. त्यांना आम्हाला उत्तर दयायाची वेळ आली आहे. असा मेसेज केला त्या वरती आमचे गावामधील 1) सौ. विजया सोमनाथ बारवकर, 2) सोमनाथ शिवाजी बारवकर, 3) जालींदर सखाराम बारवकर, 4) ज्ञानेश्वर आबासाहेब वाघापुरे यांनी त्या मेसेजला लाईक करून फिर्यादीच्या भावना दुखवेल असे कृत्य केले. त्या मेसेजचे समर्थनार्थ मेसेज लाईक केला आहे. तसेच आमचे गावातील काही लोकांनी सदर मेसेज बाबत मागुन परंतु त्या पैकी 1) सौ विजया सोमनाथ बारवकर 2) सोमनाथ शिवाजी बारवकर 3) जालीदर सखाराम बारवकर 4) ज्ञानेश्वर आबासाहेब वाघापुरे सर्व रा देउळगाव गाडा ता दौड जि पुणे यानी परत फिर्यादीच्या मेसेजला लाईक करून भावना दुखवतील हे माहीत असताना त्या मेसेजचे समर्थनार्थ मेसेज लाईक केला असल्याने फिर्यादी पाटस पोलीस औट पोस्ट येथे असताना सदर विषया बाबत चर्चा केली. त्या वेळी काही लोकांनी. चुकीचे वर्तन केले. असल्याचे नमूद करण्यात आले असून सोमनाथ बारवकर यांनी ग्रामपंचायत देऊळगाव गाडा या व्हॉटसअप ग्रुपवरती माझा अपमान होईल असे बोलला तर अशा ग्रामस्थावरती तक्रार केली जाईल. अशी धमकी दिली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तपासी अधिकारी श्री घोलप उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड विभाग दौंड यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार--सहा. फौज. बगाडे.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
पहा स्वामी समर्थ प्रकटदिन विशेष माहिती
स्वराज्यनिष्ठ राजेशिर्के घराण्याची बदनामी करणाऱ्यांना सदबुद्धी देण्यासाठी वंशजांचे शिरकाई देवीस साकडे
शिव पानंदचे आंदोलन महसुलमंत्र्यांच्या आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित- शरद पवळे/ दादासाहेब जंगले(शिव पानंद शेतरस्ता चळवळ महाराष्ट्र राज्य)
शेतात कांद्याची वखार तयार करायची नाही. भावाचाच भावाला विरोध. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मलठण येथील घटना.
पेडगाव वि.का.सेवा सोसायटी च्या चेअरमन पदी शहाजी पाटील खेडकर, व व्हा चेअरमन पदी निलेश झिटे यांची बिनविरोध निवड
इम्पा संघटनेच्या वतीने काष्टी येथे फुले - आंबेडकर जयंती संपन्न. जीवनगौरव पुरस्काराचे वितरण. डॉ. लोणकर, जयराम सोनोने व उत्तम वडवकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
बारामती सहकारी बॅंक काष्टीकरांचे सदैव तत्पर सेवेत चेअरमन सचिन सातव यांचे प्रतिपादन.
सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची सतरा वर्षानंतर गळाभेट!
तब्बल पंचवीस वर्षानंतर लिंपणगाव ते नागवडे कारखाना रेल्वे गेट नजीक रस्त्याने घेतला मोकळा श्वास
पत्रकार कुरुमकर व प्राचार्य खेडकर यांचा पत्रकार संघाकडून सन्मान
पत्रकार कुरुमकर यांनी शैक्षणिक क्षेत्राला अधिक बळ दिले -मुख्याध्यापक हौसराव दांगडे
दौंड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास खासदार सुप्रिया सुळे. रमेश आप्पा थोरात. आप्पासाहेब पवार. यांनी केले वंदन.
दीर्घायुष्य जगण्यासाठी प्रत्येकाने चांगले विचार व गुरुने दिलेल्या संस्काराची सांगड घालावी मा. प्राचार्य बाळासाहेब शेंडे
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जंयतीच्या निमीत्ताने. पुणे शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी अवजड वाहनांना प्रवेश बंदी.
अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा कायापालट- रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
नेहरू विद्यालयाचा विद्यार्थी सार्थक शिंदे याचा नवोदय परीक्षेत जिल्ह्यात तिसरा क्रमांक काय
पत्रकार कुरुमकर यांचा कानिफनाथ व लिंगाळेश्वर देवस्थान ट्रस्टकडून सन्मान
लिंपणगाव मध्ये हनुमान जयंती सोहळा उत्साही वातावरणात साजरा
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप व भिम मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
श्रीगोंदा शुगर शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने. दौंड पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची मीटिंग संपन्न. (बेकायदा अवैध धंदे बंद करा)