By : Polticalface Team ,05-10-2024
जनआधार न्युज भिमसेन जाधव बारामती : गेल्या अनेक वर्षांपासून बारामतीच्या काही भागावर असलेला जिरायत हा शिक्का कायमचा पुसून टाकण्यासाठी एक हजार कोटी रुपयांची महत्वाकांक्षी नीरा-कऱ्हा उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत आयोजित मेळाव्यात या बाबत माहिती दिली.
जवळपास 45 हजार एकराला या योजनेमुळे पाणी मिळणार असून या मुळे उसासारखे पिक या परिसरात शेतक-यांना योजनेच्या कार्यान्वयनानंतर घेता येईल, असेही अजित पवार यांनी सांगितले.
या योजनेबाबत माहिती देताना ते म्हणाले, या योजनेत 2.30 मीटर व्यासाची पाईपलाईन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 23286 व दुस-या टप्प्यात 14995 अश्वशक्तीच्या दोन मोटारी बसविण्यात येणार आहेत. एकूण 17 कि.मी. लांबीची ही पाईप लाईन असेल.
या योजनेमध्ये नीरा डावा कालव्याच्या प्रभावक्षेत्राबाहेरील 33 गावांचा समावेश करण्यात आला आहे. दरवर्षी पावसाळ्यात वाहून जाणा-या पाण्याचे नियोजन करुन दोन टीएमसी पाणी शेतीसाठी या योजनेद्वारे वापरता येणार आहे. सौरउर्जेवर या उपसा जलसिंचन योजनेचे पंप चालविण्याचे नियोजन असून त्या मुळे वीजबिलाचा बोजा पडणार नाही. राष्ट्रवादीला मोठा धक्का! मुलाच्या उमेदवारीसाठी हा आमदार सोडणार अजित पवारांची साथ?
या योजनेत समाविष्ट गावे....
वाकी, भिलारवाडी, मुढाळे, ढाकाळे, चोपडज, चौधरवाडी, देऊळवाडी, गडदरवाडी, मगरवाडी, सस्तेवाडी, खंडोबावाडी, पणदरे, वाघळवाडी, करंजेपूल, वडगावनिंबाळकर, को-हाळे बुद्रुक, जळकेवाडी, खामगळवाडी, सोनकसवाडी, कुरणेवाडी, माळेगाव बुद्रुक, माळेगाव खुर्द, क-हावागज, बारामती ग्रामीण, नेपतवळण, मेडद, काळखैरेवाडी, शेरेवाडी, बाबुर्डी, का-हाटी, जळगाव सुपे, अंजनगाव, यात नीरा डावा कालवा व जनाई शिरसाई योजनेच्या लाभक्षेत्राबाहेरील भागाचा समावेश आहे
वाचक क्रमांक :