विविध कार्यकारी सेवा सोसायटी चे निवडणूक खर्च न देणा-या संचालकावर अपात्रतेची टांगती तलवार
By : Polticalface Team ,27-06-2023
श्रीगोंदा प्रतिनीधी:-
विविध कार्यकारी सेवा सोसायटी चे निवडणूक खर्च न देणा-या संचालकावर अपात्रतेची टांगती तलवार, अॅड समित बोरुडे यांचे तक्रारीवरून जिल्हा उपनिबंधक सह संस्था अहमदनगर श्री गणेश पुरी यांचे आदेश -
अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधक सह संस्था तथा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी श्री गणेश पुरी यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील सहाय्यक निबंधक /उपनिबंधक सहकारी संस्थां यांना दि २१/०६/२०२३ रोजी लेखी आदेश देवून सहकारी सेवा संस्थाच्या निवडणूक निकालानंतर साठ दिवसांच्या आत निवडणुकीस उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांनी निवडणूक खर्च निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे जमा केला नाही अशा उमेदवारांवर निवडणूक नियमाप्रमाणे कायदेशीर कार्यवाही करण्यःचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सह सेवा संस्थेच्या निकालानंतर ६० दिवसात निवडणूक खर्च न देणा-या संचालकांचे धाबे दणाणले असून त्यांचेवर सदर पत्राने अपात्रतेची टांगती तलवार निर्माण झाली आहे .
महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीचे निवडणूक ) नियम २०१४ मधील नियम ६६ नुसार सहकारी सेवा संस्थांच्या निवडनुकीच्या निकालानंतर झालेला निवडणूक खर्च निवडणूक अधिकारी यांचेकडे निवडणुकीस उभ्या राहिलेल्या उमेदवारांनी ६० दिवसात जमा करावा व असा निवडणूक खर्च मुदतीत जमा न करणा-या व कसुरी करणा-या उमेदवारांचा अहवाल निवडणूक अधिकारी यांनी निबंधकांना (जिल्हा उपनिबंधक सह संस्था अहमदनगर ) सादर करावा व असा अहवाल प्राप्त झाल्यावर निबंधकांनी निवडणूक खर्च देण्यास कसूर करणा-या उमेदवारांना म्हणणे मांडण्याची संधी दिल्यानंतर ते उमेदवार निवडून येण्यास तसेच कोणत्याही संस्थेचा सदस्य होण्यास तीन वर्षे अपात्र ठरविला जाईल अशी कायदेशीर तरतुत आहे .
अॅड समित बोरुडे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील अनेक विविध कार्यकारी सह सेवा सो संचालक हे निवडणूक नियमाप्रमाणे ६० दिवसात निवडणूक खर्च जमा न करता म्हणजेच कायद्याने अपात्र असतानाही बेकायदेशीरपणे सेवा संस्थेचे संचालक म्हणून काम करत असून निवडणूक अधिकारी व जिल्हा उपनिबंधक सह संस्था तथा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी श्री गणेश पुरी यांच्या कर्तव्यातील कसुरीमुळे महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीचे निवडणूक )नियम २०१४ मधील नियम ६६ उल्लंघन होत असलेने तक्रार करून जिल्हा उपनिबंधक सह संस्था यांचे कार्यालयासमोर तसेच मा.सहकार आयुक्त व निबंधक सह संस्था महाराष्ट्र राज्य ,पुणे यांचेसमोर आंदोलनाचा इशारा दिला होता .त्यावरून जिल्हा उपनिबंधक सह संस्था तथा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी श्री गणेश पुरी यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सहाय्यक निबंधक /उपनिबंधक सहकारी संस्था यांना उपरोक्त निवडणूक नियमाप्रमाणे कारवाई करून अहवाल त्यांना सादर करण्याचे लेखी आदेश दिले आहे.
वाचक क्रमांक :