By : Polticalface Team ,08-10-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता ०८ ऑक्टोबर २०२४ दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे राहु ता दौंड जिल्हा पुणे येथील युको बँकेचे असिस्टंट मॅनेजर विष्णुदास दामोदरम पेरीयाडात यास दि ०३/१०/२०२४ रोजी मौजे राहु ते वाघोली रोडवर मारहाण झाली होती. विष्णुदास दामोदरम पेरीयाडात वय ३० वर्षे व्यवसाय, नोकरी असिस्टंट मॅनेजर यूको बँक शाखा राहु सध्या रा युको बॅक शेजारी राहु ता दौंड जि पुणे मूळ रा पन्नाकल हाउस मोचा पो उपलीकाई ता होसादुर्ग जि कासरगोड राज्य केरळ. याचे फिर्यादी वरून आरोपी.-१) महेश शिवाजी हंबिर रा. पाटेठाण ता. दौंड जि. पुणे २) ओंकार शांताराम गायकवाड रा. मेमाणवाडी टाकळी भिमा ता. दौंड जि. पुणे व इतर ०४ अनोळखी इसमांन विरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे गुरनं-९७४/२०२४ बीएनएस १२६ (२), १३२, १२१(१), १८९(२), १९१(२),१९०,३५२,३५१(२) अंन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अधिकारी मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी नामे- महेश शिवाजी हंबीर वय-21 यांस आज ता. 07/10/2024 रोजी अटक करण्यात आले असल्याची माहिती यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली. पुढे बोलताना ते म्हणाले मौजे राहू ता. दौंड येथील इको बॅकेचे असिस्टंट मॅनेजर विष्णूदास दामोदरम पेरियाडात हल्ली रा. राहू मुळ राहणार पन्नकलम हाऊस मोचा पोस्ट उपलकाई ता. सोसादुर्ग जि. कासरगोड, राज्य- केरळ यांना झालेल्या मारहाण प्रकरणातील फरार मुख्य आरोपी नामे - महेश शिवाजी हंबीर वय-21 वर्षे रा.पाटेठाण ता. दौंड जि.पुणे यास यवत पोलिसांनी अटक करून मेहरबान दौंड न्यायालया समोर हजर केले असता मे.न्यायालयाने आरोपीस दि 09/10/2024 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड सुनावली असल्याचे त्यांनी सांगितले या बाबत अधिक माहिती अशी की वर नमुद केले असलेल्या तारीख वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी भारत सरकार व्दारे चालविण्यात येणाऱ्या यूको या राष्ट्रीयकृत बँकेच्या राहू ता दौंड जि पुणे येथील शाखेत असिस्टंट मॅनेजर या पदावर कर्तव्यावर असताना ते व त्यांचे सहकारी यांना बँके जवळील राहु ते वाघोली रोडवर आरोपी नं १ व २ इतर अनोळखी ०४ इसम यांनी मोटार सायकल वरून येवुन त्याचा रस्ता अडवून बँकेचे एटीएम डेबिट कार्ड का काढुन दिले नाही ?
या कारणा वरून लाकडी दांडक्याने मारहाण करून फिर्यादी तसेच त्यांचे दोन सहकारी यांना शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली वगैरे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते गुन्ह्याचा अधिक पुढील तपास यवत पोस्टे चे पोलीस निरीक्षक श्री नारायण देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार श्री संतोष कदम हे करीत आहेत
वाचक क्रमांक :