By : Polticalface Team ,2024-11-30
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ३० नोव्हेंबर २०२४ दौंड तालुक्यातील मौजे कासुर्डी तालुका दौंड जिल्हा पुणे कासुर्डी हद्दीत मध्यरात्री बिबट्याचा भक्षणासाठी भटकंती करत असताना कासुर्डी हद्दीत रेल्वे लाईन ओलांडून जात असताना १२ ते १३ वर्षांच्या बिबट्याचा रेल्वेच्या धडकेने अपघात होऊन जागीच मृत्यू झाला असल्याची खबर परीसरात पसरली होती या अपघातामध्ये सदर बिबट्याचे आर्धे निम्मे तुकडे रेल्वे रुळाच्या बाजूला पडलेले आढळून आले
या अपघाताची खबर यवत येथील वनविभागाचे कर्मचारी वनपाल खरात यांना मिळताच त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी दौंड यांना सादर घटनेची माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुणे ते सोलापूर बाजूकडे जाणाऱ्या रेल्वे एक्सप्रेस गाडीच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तवला जात असून सदर बिबट्याचे आर्धे निम्मे तुकडे रेल्वे रुळाच्या बाजूला पडलेले जमा करून घटना स्थळी पंचनामा करण्यात आला. तसेच पशुसंवर्धन विभाग अधिकारी अजित पवार यांना संपर्क साधुन सदर घटनेची माहिती दिली असल्याचे खरात यांनी सांगितले.
सदर बिबट्याचे मृत शेव वनविभाग कार्यालय पिंपळगाव या ठिकाणी शिव विच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले असल्याचे यवत येथील वनपाल अंकुश खरात यांनी सांगितले. या प्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी दौंड श्री राहुल काळे वनपाल यवत श्री अंकुश खरात वनरक्षक यवत श्री शिवकुमार बोंबले वनरक्षक वाळकी श्री अक्षय शितोळे वनरक्षक खामगाव श्री ज्ञानदेव भोंडवे. वन कर्मचारी बापू कुदळे उपस्थित होते.