By : Polticalface Team ,2024-11-26
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड: २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधानाच्या अंन्वये प्रतेक नागरिकांना स्वतंत्र अधिकारी प्राप्त झाला आहे राज्य घटने वर देश चालला आहे. अशी प्रतिक्रिया यवत ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन २६ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते या प्रसंगी ग्रामविकास अधिकारी बालाजी सरोदे यांनी बोलताना व्यक्त केली.
या वेळी सरपंच समीर दोरगे. उपसरपंच सुभाष यादव तसेच ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी कर्मचारी समस्त ग्रामस्थ उपस्थित होते. भारतीय राज्यघटनचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर व संविधान उद्देशिका प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले. या वेळी अनेक नागरिकांनी उपस्थित दर्शवली होती
यवत पोलीस स्टेशन या ठिकाणी संविधान दिन साजरा करण्यात आला पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस सहायक उपनिरीक्षक पोलिस अधिकारी कर्मचारी यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन केले. भारतीय राज्यघटनेतील नागकांचे मूलभूत हक्क समता बंधुता स्वतंत्र आणि न्याय व लोकशाही या संदर्भात यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी मार्गदर्शन केले. ते बोलताना म्हणाले डॉ बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते त्यांनी जगातील सर्वात उत्कृष्ट घटना तयार केली यामध्ये सर्वांना समान न्याय व अधिकार दिला आहे. धर्म जात पंथ विरहात आम्ही भारताचे लोक असा विचार देशातील सर्व नागरिकांना देऊन संविधानाच्या चौकटीत लोकशाही रुजवली अशी घटना तयार करुन २६ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वाता हस्त लिखित करून पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद व भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे भारतीय राज्यघटना देण्यात आली. यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी उपस्थित पोलीस कर्मचारी यांना संविधान दिनाच्या निमित्ताने बोलताना सांगितले.
वाचक क्रमांक :