दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलीसांची छापेमारी. दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
By : Polticalface Team ,21-05-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता २० मे २०२५ दौंड शहर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बेकायदा बिगर परवाना कल्याण मटका नावाची जुगार दौड गावचे हद्दीत घंटाचाळ व शालीमार चौक या ठिकाणी ता १९ रोजी दौंड पोलीसांनी छापा टाकून कारवाई केली सदर आरोपी ओळखीचे लोकांकडून पैसे घेऊन त्यांना जुगार खेळवीत असताना मिळून आले वरून
फिर्यादी १) महादेव विभीषण जाधव पोलीस कों. नेमणुक दौड पोलीस स्टेशन पुणे ग्रामिण. तसेच फिर्यादी २) नितिन कैलास बोराडे पोलीस हवालदार नेमणुक दौड पोलीस स्टेशन पुणे ग्रामिण सरकारतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
आरोपी- १) अशोक रामा गुप्ते वय 65 वर्षे रा. इंदिरा नगर दौड ता, दौड जि.पुणे. आरोपी २) अजय आत्माराम शिंदे वय 30 वर्षे रा. शालीमार चौक दौड ता. दौड जि.पुणे यांचे विरुध्द दौंड पोलीस ठाण्यात १) गु.रजि नं 357/2025. २) गु.रजि नं 358/2025 मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि कारवाई ची घटना ता.19/05/2025 रोजी दौंड शहरातील मुख्य चौकात 14.00 वा.चे सुमारास व मौजे दौड गावचे हद्दीत घंटाचाळ दौड ता.दौंड, जि.पुणे या ठिकाणी छापा टाकून करण्यात आली असल्याची माहिती दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली
ता.19/05/2025 रोजी मौजे दौड गावचे हद्दीत डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक. तसेच मौजे दौड गावचे हद्दीत घंटाचाळ दौड येथे इसम नामे अशोक रामा गुप्ते वय 65 वर्षे रा.इंदीरा नगर दौड ता, दौड जि.पुणे यांनी आपले कब्जात बेकायदा बिगर परवाना कल्याण मटका नावाची जुगाराची साधने जवळ बाळगून आपले ओळखीचे लोकांकडून पैसे घेऊन त्यांना जुगार खेळवीत असताना मिळून आला असे नमूद करण्यात आले आहे तसेच मौजे दौड गावचे हद्दीत घंटाचाळ दौड ता. दौंड, जि. पुणे येथे आडोशाला इसम नामे अजय आत्माराम शिंदे वय 30 वर्षे रा. शालीमार चौक दौड ता. दौड जि.पुणे यांनी आपले कब्जात बेकायदा बिगर परवाना कल्याण मटका नावाची जुगाराची साधने व रोख रक्कम व जुगाराची साधने जवळ बाळगून आपले ओळखीचे लोकांकडून पैसे घेऊन त्यांना जुगार खेळवीत असताना मिळून आला. असल्याचे नमूद करण्यात आले असून त्यांचे विरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे सरकारतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार- सपोफौ/संतोष शिंदे पोलीस हवालदार ढुके. म पो हवा वाबळे पुढील तपास करीत आहेत
वाचक क्रमांक :