गांळप हंगामा करीता 16 ऊस तोड कोयते (32 मजुर) 16 बैल गाड्या (32 बैल) पुरवतो. असा करार करून १८ लाख रुपयांची फसवणुक प्रकरणी गुन्हा दाखल.
By : Polticalface Team ,21-05-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता 20 मे 2025 दौंड तालुक्यातील मौजे हिंगणी बेरर्डी ता दौंड जिल्हा पुणे येथील प्रभाकर दगडु भोसले यांची १८ लाख रुपयाची फसवणूक झाल्या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात संबंधित दोन इसमा विरुद्ध तक्रार करण्यात आली आहे.
या बाबत फिर्यादी प्रभाकर दगडु भोसले वय 53 वर्षे धंदा शेती रा.हिंगणी बेरर्डी ता.दौंड जि.पुणे. यांच्या तक्रारी वरून दौंड पोलीस स्टेशन येथे आरोपी 1) लक्ष्मण मधुकर मोरे रा बोडरे ता.चाळीसगांव जि जळगाव 2) सुरेश रामसिंग सपकाळे रा.गाधोडे ता अमोडा जि जळगाव. यांचे विरुध्द. दौंड पोलीस ठाण्यात दिनांक. 20/05/2025 रोजी गु.र.नं 360/2025 भारतीय न्याय संहिता. कलम 318(4) 351(2) 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली.
या बाबत अधिक माहिती अशी की दिनांक 20/08/2024 रोजी फिर्यादी यांच्या राहत्या घरी इसम नामे 1) लक्ष्मण मधुकर मोरे,रा बोडरे ता. चाळीसगांव जि.जळगाव 2) सुरेश रामसिंग सपकाळे रा गाधोडे ता.अमोडा जि.जळगाव हे घरी येवून फियादीस म्हणाले सन 2024 2025 च्या गांळप हंगामा करीता 16 ऊस तोड कोयते (32 मजुर) व 16 बैल गाड्या (32 बैल) पुरवतो असे म्हणून फियादी सोबत करार करून विश्वास संपादन करून दिनांक.09/11/2024 रोजी पर्यत फिर्यादी कडून वेळोवेळी बँक खात्यावर तसेच रोख स्वरूपात एकुन 18 लाख रूपये घेवुन ठरल्या प्रमाणे मजुर न पुरवता व फिर्यादी कडून वेळोवेळी घेतलेले एकुण १८ लाख रुपये परत देण्या ऐवजी उलट फियादीस
फोन वरून जिवे मारण्याची धमकी देवुन आर्थिक फसवणुक केल्या बाबत इसम नामे 1) लक्ष्मण मधुकर मोरे रा बोडरे ता. चाळीसगांव जि जळगाव 2) सुरेश रामसिंग सपकाळे रा. गाधोडे ता अमोडा जि जळगाव यांच्या विरूध्द दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल पोलीस हवालदार ढुके. पोलीस उपनिरीक्षक उगले पुढील तपास करीत आहेत.
वाचक क्रमांक :