हरिश्चंद्र शिंदे यांचे आर एस पी अधिकारी पदाचे प्रशिक्षण पूर्ण.

By : Polticalface Team ,02-06-2025

हरिश्चंद्र शिंदे यांचे आर एस पी अधिकारी पदाचे प्रशिक्षण पूर्ण. लिंपणगाव( प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या काष्टी येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय काष्टी चे शिक्षक हरिश्चंद्र शिंदे यांनी नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या गृह विभाग, पोलीस विभाग आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त अधिपत्याखाली घेण्यात आलेले महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षण (RSP) अधिकारी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. हे प्रशिक्षण २१ मे २०२५ ते ३० मे २०२५ या कालावधीत पोलीस मुख्यालय, अहिल्यानगर येथे पार पडले. या प्रशिक्षणामध्ये महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटना, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पदचालन, वाहतूक नियंत्रण, नागरी संरक्षण, अग्निशमन सेवा, प्रथमोपचार व आकस्मिक सेवा अशा विविध बाबींवर सखोल मार्गदर्शन देण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार, शिक्षक सेवेत असतानाही RSP अधिकारी बनून खाकी वर्दी परिधान करण्याची संधी हरिश्चंद्र शिंदे यांना मिळाली. विद्यालयाचे मुख्याध्यापक पंडित घोंगडे यांनी सांगितले की, येत्या शैक्षणिक वर्षापार विद्यार्थ्यांना शिस्त व अनुशासनाचे धडे विशेष तासिकाद्वारे दिले जाणार आहेत. या प्रशिक्षणासाठी मुसा सय्यद, मेजर मोरे मेजर दाभाडे विभागीय समादेशक बोंतले सर मिड, जिल्हा उपसमादेशक प्रकाश मिंड सर ,राखीव पोलीस निरीक्षक उमेश परदेशीसाहेब आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेसाहेब यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. प्रवचनकार असलेले श्री शिंदे हरिश्चंद्र सर यांनी हे कठीण प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल तालुक्याचे आमदार विक्रमसिंह बबनराव पाचपुते, स्थानिक स्कूल कमिटी,स्थानिक सल्लागार समिती, शालेय व्यवस्थापन व विकास समिती, माता-पालक संघ, पालक-शिक्षक संघ, काष्टी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य, सर्व विद्यार्थ्यांनी विशेष अभिनंदन केले आहे. ग्रामपंचायत आनंदवाडीच्या वतीने हरिश्चंद्र शिंदे सरांचा सत्कार करण्यात आला.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

मढेवडगाव येथे वृक्ष संवर्धन आणि समतेचा संदेश देत गावकऱ्यांनी साजरी केली बकरी ईद..

सावधान! तुमच्या नावावर परक्याचं SIM वापरलं जातंय का? फक्त मोबाईल नंबर टाका… आणि जाणून घ्या किती सिम आहेत तुमच्या नावावर!

प्रभाग रचना विरोधात सर्व पक्षीय बैठक बारामतीत संपन्न — जनआंदोलनाची तयारी

मा. पोलीस अधिक्षक, श्री. अतुल कुलकर्णी यांच्या विकसीत गाव योजनेचा शुभारंभः - करमाळा तालुक्यातील सहा गावांना घेतले दत्तक फिसरे गावामध्ये सेंद्रीय शेती व जलतारा प्रकल्पाच्या कार्यशाळेचे आयोजन.

दिनांक सात जून रोजी बकरी ईद ची नमाज इदगाह मैदानावर आठ वाजता होणार,,,,,,,, कलीम काझी सर

खडकी गावातील बस स्टॉपला गाडी का? थांबवत नाही. एसटी वाहक चालकास शिवीगाळ मारहाण केल्या प्रकरणी 7 इस्मान विरुद्ध गुन्हा दाखल

संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांना DBT प्रणाली अंमलात न आल्याने लाभ अडकले; वंचित बहुजन युवा आघाडीचे तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

यवत गावची बाजार पेठ उंचावण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून गाव कारभारी यांनी प्रयत्न केला पाहिजे.

राजेंद्र दादा नागवडे व सौ नागवडे यांच्या विशेष प्रयत्नातून घरकुल प्रकल्पास राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान

राज्यस्तरीय तबला स्पर्धेत श्रेयस सोनटक्के प्रथम; थायलंडसाठी निवड

वसुंधरा बचाव अभियानचा स्तुत्य उपक्रम* लोणी व्यंकनाथ येथे मान्यवरांचा वृक्ष भेट देऊन सन्मान. , सामाजिक एकतेचा संदेश देणारा अद्वितीय उपक्रम

अखेर वृत्त प्रसिद्ध होताच महावितरणकडून वीज ग्राहकाचा विलंब दंड संबंधित एजन्सीच्या नावे

हरिश्चंद्र शिंदे यांचे आर एस पी अधिकारी पदाचे प्रशिक्षण पूर्ण.

डॉ. राजेंद्र प्रसाद विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची तब्बल पंधरा वर्षानंतर गळाभेट

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला