जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

By : Polticalface Team ,30-05-2025

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

श्रीगोंदा (प्रतिनिधी):श्रीगोंदा तालुक्यातील सहकार क्षेत्रातील प्रमुख नेत्यांनी पुन्हा एकदा पक्षांतर करत, आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा पवार गट) मध्ये प्रवेश केल्याने, सामान्य जनतेत आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे. नेते सोयीनुसार पक्ष बदलतात, आणि विचारधारा मात्र वेशीवर टांगली जाते, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, कुकडी साखर कारखान्याचे चेअरमन व माजी आमदार राहुल जगताप आणि श्रीगोंदा तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी नुकताच मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला. या वेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, नेते भगवानराव पाचपुते, आणि दोन्ही कारखान्यांचे संचालक उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून या प्रवेशाची चर्चा सुरु होती, आणि ती आज (२८ मे) मुंबईतल्या कार्यक्रमात वास्तवात उतरली. या प्रवेशामुळे अजित दादा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस गटाला श्रीगोंदा तालुक्यात मोठे बळ मिळाले आहे. यापूर्वीही घनश्याम व अण्णासाहेब शेलार यांचा पक्षप्रवेश झाल्याने, हा तालुका आता जवळपास अजित दादांच्या वर्चस्वाखाली गेला आहे.

मात्र या घडामोडींनी स्थानिक राजकारणात प्रचंड खळबळ निर्माण केली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपूर्वीच समीकरणं झपाट्याने बदलल्याने, निवडणुका चुरशीच्या होणार, हे निश्चित मानले जात आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.

ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.

दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले

कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.

देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक