प्रभाग रचना विरोधात सर्व पक्षीय बैठक बारामतीत संपन्न — जनआंदोलनाची तयारी

By : Polticalface Team ,2025-06-06

प्रभाग रचना विरोधात सर्व पक्षीय बैठक बारामतीत संपन्न — जनआंदोलनाची तयारी

बारामती (प्रतिनिधी भिमसेन जाधव जन आधार न्युज — सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्यानंतर निवडणूक घेण्याच्या प्रक्रिया चालू करण्यात येत आहे. यामध्ये महत्वचे प्रभाग रचना तयार करत असताना प्रस्थापित राजकारण्यांच्या दबावाखाली येऊन प्रभाग रचना बेकायदेशीरपणे करण्यात येतात व विरोधक निवडून येणार नाही याची दक्षता घेतात  नैसर्गिक परी सीमांचे पालन केले जात नाही, प्रभाग फोडली जातात, ज्या समुदायाचा प्रभाग आहे त्या समुदायाचा प्रभाग न ठेवता  इतर समुदाय त्यामध्ये जोडला जातो, प्रभागांमध्ये मतदारांची एकसारखी संख्या ठेवली जात नाही, नदी, रस्ते, रेल्वे लाईन, ओढे , नाले यांना क्रॉस करून प्रभाग बनवले जातात त्यामुळे बारामती शहर व तालुक्यात नव्याने करण्यात येणाऱ्या प्रभाग रचने मध्ये कायदेशीरपणे व नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाच्या आधारे प्रभाग रचना करण्यासाठी व बेकायदेशीर प्रभाग रचनेच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आज सर्व पक्षीय बैठक पाठबंधारे गेस्ट हाऊस येथे पार पडली. यावेळी उपस्थित सर्व पक्षांनी एकमुखाने या चुकीच्या प्रभाग रचनेला तीव्र विरोध करत तक्रार/हरकत दाखल करण्याचा निर्णय घेतला.

बैठकीत प्रभाग रचना ही लोकप्रतिनिधींच्या सोयीसाठी नव्हे, तर जनतेच्या हितासाठी असावी, असे स्पष्ट करत सद्य:स्थितीत रचण्यात आलेले प्रभाग हे अन्यायकारक व पक्षपाती असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. त्यामुळे जुनी रचना तत्काळ रद्द करून नव्याने न्याय्य पद्धतीने प्रभाग रचना करावी, अशी मागणी करण्यात आली.

बैठकीत पुढील आंदोलनाची रणनीतीही ठरवण्यात आली. त्यानुसार —

नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम

विविध प्रभागांमध्ये बैठका व सभा घेणे

पत्रकार परिषद घेऊन माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट करणे

निवेदनाद्वारे प्रशासकीय पातळीवर हरकत नोंदवणे

आवश्यकतेनुसार न्यायालयात याचिका दाखल करणे

या सर्व टप्प्यांवर एकसंघपणे लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ऍड. संदीप विनोदकुमार गुजर , सत्यव्रत अर्जुनराव काळे,  मनसेचे ऍड. सुधीर पाटसकर, ऍड. पोपटराव सूर्यवंशी, ऍड श्री एस एन बापू जगताप शरदचंद्र पवार गट, ऍड. निलेश वाबळे, बसपाचे काळूराम चौधरी, वंचितचे युवा जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे, शिवसेना (ठाकरे गट) ऍड. राहुल शिंदे, आरपीआयचे राजेंद्र सोनवणे, संजय वाघमारे, एम आय एम चे फैय्याज  शेख, बीजेपी चे ऍड. नितीन भामे, विरोधी पक्षनेते सुनील सस्ते,यशपाल भोसले, काँग्रेसचे वीरधवल गाडे, रासपचे ऍड. अमोल सातकर, शिवसेना शिंदे गटाचे सुरेंद्र जेवरे,  आदी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवडणुकीसंदर्भात होत असलेली ही एकतर्फी कारवाई थांबवण्यासाठी आता जनआंदोलन छेडण्याचा निर्धार सर्वपक्षीय नेतृत्वाने व्यक्त केला आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites



मढेवडगाव येथे वृक्ष संवर्धन आणि समतेचा संदेश देत गावकऱ्यांनी साजरी केली बकरी ईद..

सावधान! तुमच्या नावावर परक्याचं SIM वापरलं जातंय का? फक्त मोबाईल नंबर टाका… आणि जाणून घ्या किती सिम आहेत तुमच्या नावावर!

प्रभाग रचना विरोधात सर्व पक्षीय बैठक बारामतीत संपन्न — जनआंदोलनाची तयारी

मा. पोलीस अधिक्षक, श्री. अतुल कुलकर्णी यांच्या विकसीत गाव योजनेचा शुभारंभः - करमाळा तालुक्यातील सहा गावांना घेतले दत्तक फिसरे गावामध्ये सेंद्रीय शेती व जलतारा प्रकल्पाच्या कार्यशाळेचे आयोजन.

दिनांक सात जून रोजी बकरी ईद ची नमाज इदगाह मैदानावर आठ वाजता होणार,,,,,,,, कलीम काझी सर

खडकी गावातील बस स्टॉपला गाडी का? थांबवत नाही. एसटी वाहक चालकास शिवीगाळ मारहाण केल्या प्रकरणी 7 इस्मान विरुद्ध गुन्हा दाखल

संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांना DBT प्रणाली अंमलात न आल्याने लाभ अडकले; वंचित बहुजन युवा आघाडीचे तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

यवत गावची बाजार पेठ उंचावण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून गाव कारभारी यांनी प्रयत्न केला पाहिजे.

राजेंद्र दादा नागवडे व सौ नागवडे यांच्या विशेष प्रयत्नातून घरकुल प्रकल्पास राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान

राज्यस्तरीय तबला स्पर्धेत श्रेयस सोनटक्के प्रथम; थायलंडसाठी निवड

वसुंधरा बचाव अभियानचा स्तुत्य उपक्रम* लोणी व्यंकनाथ येथे मान्यवरांचा वृक्ष भेट देऊन सन्मान. , सामाजिक एकतेचा संदेश देणारा अद्वितीय उपक्रम

अखेर वृत्त प्रसिद्ध होताच महावितरणकडून वीज ग्राहकाचा विलंब दंड संबंधित एजन्सीच्या नावे

हरिश्चंद्र शिंदे यांचे आर एस पी अधिकारी पदाचे प्रशिक्षण पूर्ण.

डॉ. राजेंद्र प्रसाद विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची तब्बल पंधरा वर्षानंतर गळाभेट

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला