वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
By : Polticalface Team ,30-05-2025
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा
२५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
श्रीगोंदा प्रतिनिधी
, दि. ३० मे २०२५ : कालचा वर्ग, आजचा परिवार! अशी भावना मनात साठवत, वांगदरी विद्यालयाच्या इयत्ता दहावी २००१ च्या बॅचचा स्नेहमेळावा तब्बल पंचवीस वर्षांनंतर उत्साहात आणि भावनांनी भारलेल्या वातावरणात पार पडला. दिनांक २५ मे रोजी यवत जवळील निसर्गरम्य ‘मेहेर रिट्रीट ऍग्रो टुरिझम’ या ठिकाणी जुन्या मित्र-मैत्रिणींचा पुन्हा एकत्र येण्याचा सोहळा रंगला.
जवळपास ३६ माजी विद्यार्थी, ज्यात २१ मुले व १५ मुली सहभागी झाल्या होत्या, त्यांनी आपली व्यस्त जीवनरेषा थांबवून या खास क्षणासाठी उपस्थिती लावली. अवकाळी पावसाच्या सरी पडत असतानाही जुन्या मित्रांना भेटण्याच्या ओढीपोटी कोणाच्याच पायांना लगाम लागला नाही.
या स्नेहमेळाव्याचे संयोजन गणेश नागवडे, अविनाश जगताप, संतोष सोनवणे, गीतांजली पवार आणि कविता गायकवाड या माजी विद्यार्थ्यांनी हिरीरीने केले. त्यांनी आठवणींच्या या गोफात प्रेमाचे धागे मिसळत मनमिळावूपणाचा झंकार घडवून आणला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व उपस्थितांनी आपापला पंचवीस वर्षांचा जीवनप्रवास थोडक्यात कथन करत अनुभवांची शिदोरी उलगडली. शालेय आठवणी, बालमित्रांच्या गमतीजमती, शिक्षकांचे मार्गदर्शन यांचे सूर जणू पुन्हा एकदा हृदयात गुंजले. गप्पागोष्टी, फोटोसेशन्स आणि हास्यविनोदांनी दिवस कसा गेला ते कळलेही नाही!
या स्नेहमेळाव्यास नितीन पवार, शिवाजी चोरमले, वैशाली नागवडे, रेखा नागवडे, वृषाली नागवडे, जयश्री लगड, अनिल जानकर, काका घाडगे, सचिन जाधव, कीर्ती राऊत, अश्विनी सोनवणे, बापू महानोर, भूषण गायकवाड, छाया बडे, धनंजय कोरडकर, जालिंदर काळे, बाळू महानोर, किरण जाधव, मोहन भिसे, पल्लवी दरेकर, पाराजी सरक, रफिक सय्यद, राहुल इथापे, सदा महानोर, संतोष जाधव, सीमा गोरे, सुनीता सुत्तेकर, रूपाली खंडागळे यांसह अनेक माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
अशा या स्नेहमेळाव्याने सर्वांच्या मनात नात्यांची उब पुन्हा जागवली, आणि जुने दिवस नव्याने अनुभवण्याचा एक अविस्मरणीय क्षण देऊन गेला अशी भावना प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण जाधव यांनी केले तर कार्यक्रमाची सांगताकरताना, गणेश नागवडे यांनी सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले आणि पुढील स्नेहमेळाव्यासाठी अधिक उत्साहाने एकत्र येण्याचे आवाहन केले.
वाचक क्रमांक :
शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी