नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

By : Polticalface Team ,25-05-2025

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

लिंपणगाव (प्रतिनिधी) शालेय जीवनातील मित्र असावेत परंतु ते संकट काळात उभे राहावेत. असे मित्रत्व असावेत मित्र संकटात सापडला तर मित्रांनीच त्या मित्राला धाडसाने व धैर्याने उभे राहण्यासाठी मदत करणे म्हणजे तो माणुसकी जोपासणे हा हेतू असतो. मग तो मित्र कोणताही व्यवसायात असू देत. असाच एक प्रसंग इंदिरा गांधी विद्या निकेतन या विद्यालयाचे इयत्ता दहावीचे शैक्षणिक वर्ष 90 -91 या वर्षातील माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांचे अनेक वर्षांपासूनचे श्रीगोंदा शहरात स्वीट होमचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय त्यांनी त्यांच्या कौशल्यावर; जिद्दीवर श्रीगोंदे शहरात अगदी हवाहवासा वाटणारा केला. परंतु १५ मे रोजी सकाळी अचानक त्यांच्या स्वीट होमच्या दुकानात विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली आणि काही क्षणातच संपूर्ण स्वीट होमचे दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी जळून गेले. त्यांचे जवळपास 50 लाखाच्या पुढे नुकसान झाल्याचे समजले. ही बातमी त्याकाळी शिक्षण घेत असलेल्या इंदिरा गांधी विद्यानिकेतन या विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांच्या वर्ग मित्रांना समजले. या सर्व वर्गमित्रांना व्यवसाय करत असताना मित्राचे अतोनात नुकसान झाल्याची बातमी वाचण्यात आली. या सर्व वर्ग मित्रांनी एकमेकांना या नुकसानीची खबर दिली. हा व्यवसाय पुन्हा जिद्दीने सुरू करण्याचा सल्ला सर्व वर्ग मित्रांनी चंद्रकांत वाजे यांना दिला. . एवढे मोठे नुकसान कुणाचेच होऊ नये परंतु ते आपले कर्म म्हणून हा प्रकार घडल्याचे वाजे यांनी सांगितले. मितृत्वाचे दान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. या वर्ग मित्रांनी जवळपास वाजेंना व्यवसाय सुरू करण्यासाठी व आर्थिक मदत म्हणून एक लाख एक हजार रुपये व्यावसायिक चंद्रकांत वाजे यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजीराव गवळी व ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांच्या हस्ते 25 मे रोजी प्रदान करण्यात आली. यावेळी वर्गमित्र दत्तात्रय नागवडे; बाळासाहेब फापाळे ग्रामपंचायत सदस्य मढेवडगाव; भागवत वायबसे; सुभाष कुरुमकर; मिलिंद नागवडे; संतोष शिंदे; सतीश धलंगे नारायण शेंडे आदी वर्गमित्र यावेळी उपस्थित होते.


           यावेळी ऋणनिर्देश करताना चंद्रकांत वाजे यावेळी म्हणाले की श्रीगोंदा फॅक्टरी येथील इंदिरा गांधी विद्यालयात शिक्षण घेताना शालेय जीवनात लहानपणापासून वर्ग मित्रांची मित्रत्वाचे नाते निर्माण झाले. ते जवळपास 25 वर्षापासून आजही नाते घट्ट आहे. माझ्या व्यवसायाचे अतोनात नुकसान झाले. मित्रांना अतिशय दुःख झाले. सर्वांनी फोन द्वारे चौकशी केली मन हलके करण्याचा सर्वांनीच प्रयत्न केला. संकटकाळात मला दिलेला या माझ्या वर्ग मित्रांनी आधार ही माझ्यासाठी अनमोल देणगी आहे. यापुढे कोणत्याही वर्गमित्रावर असा प्रसंग येऊ नये; परंतु आलाच तर आम्ही सर्वजण एकोप्याने त्या मित्राला आधार देण्याचे निश्चित काम करू; अशी ग्वाही देत श्री वाजे यांनी पुढे म्हटले आहे की  या माझ्या वर्ग मित्रांचा मी सतत ऋणी राहील असे सांगून सर्व मित्रांचे आभार व्यक्त मानले..



वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.