प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

By : Polticalface Team ,25-05-2025

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे -  ॲड. राहुल सावंत करमाळा प्रतिनिधी : - प्रधानमंत्री आवास घरकुल योजना ग्रामीण अंतर्गत ज्या कुटुंबाला आजपर्यंत घरकुल योजना चा लाभ मिळाला नाही अशा गरजू लाभार्थ्यांनी 31 मे 2025 पर्यंत आपल्या ग्रामपंचायत ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून सर्व्हेक्षण करून घ्यावे किंवा स्वतः आवास प्लस 2024 सर्व्हेक्षण या ॲप द्वारे सर्व्हेक्षण करून घ्यावे असे आवाहन पंचायत समिती माजी सदस्य व श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक ॲड. राहुल सावंत यांनी केले. तसेच प्रत्येक ग्रामपंचायत ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांनी आपल्या गावातील सर्व्हे पारदर्शक करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा होईल यासाठी प्रयत्नशील रहावे आणि आपल्या गावातील एकही लाभार्थी यापासून वंचित राहू नये याची काळजी घ्यावी. प्रधानमंत्री आवास घरकुल योजना ग्रामीण अंतर्गत घरकुलाच्या लाभासाठी ग्रामीण भागात बेघर , कच्च्या घरात वास्तव्य करणाऱ्या कुटुंबाचे आवास प्लस 2025 सर्व्हेक्षण करमाळा तालुक्यात सुरू आहे. या सर्व्हे साठी शासनाने पुन्हा 31 मे 2025 पर्यंत मुदत वाढवून दिली आहे. तालुक्यांतील सर्व ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्यांमार्फत किंवा स्वतः आवास प्लस 2024 सर्व्हेक्षण या ॲप द्वारे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. या सर्व्हेक्षणासाठी 31 मे 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जी कुटुंब अद्याप ही सर्व्हेक्षण पासून वंचित आहेत त्यांनी सर्व्हेक्षण करून घेण्यात यावे . कोणत्याही लाभार्थ्यांला अडचण आली तर त्यांनी माझ्याकडे संपर्क साधावा असे आवाहन ॲड. राहुल सावंत यांनी केले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी

संत शेख महंमद व संत तुकाराम यांच्यावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन

घरगुती वादाचा राग मनात धरून. भाच्यानेच मामाच्या डोक्यात दगड घालुन केला खुन. यवत येथील धक्कादायक घटना.