निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

By : Polticalface Team ,27-05-2025

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का करमाळा निमगाव हवेली येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची नुकतीच निवडणूक पार पडली या निवडणूकीत बागल गटाचे सतिश निळ यांनी सर्व अर्ज मागे घेत फक्त एक जागा लढवली व तटस्थ भुमिका घेतली होती तर संजयमामा शिंदे गटाकडून नानासाहेब निळ यांच्या नेतृत्वाखाली सर्व पॅनेल मैदानात होता या मध्ये बागल व शिंदे गटाला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले असून जेष्ठ नेते विठ्ठल बापू जगदाळे , यांच्या नेतृत्वाखाली जगताप पाटील युतीने १३ पैकी ११ जागेवर दणदणीत मतांनी विजय मिळवला आहे. शहाजी शरद भोसले, संभाजी भारत भोसले, सौ स्वाती बाळासाहेब भोसले,विठ्ठल घनश्याम जगदाळे, अर्जुन उद्धव निळ, लहू महादेव निळ, दादासाहेब पांडूरंग जगताप, सौ आहिल्या रावसाहेब निळ, सौ उर्मिला पंडित निळ, विठ्ठल महिपती जगताप, हणुमंत कल्याण निळ हे बहुमतानी विजयी झाले आहेत तर बागल गटाचे राजेंद्र ननवरे ,शिंदे गटाचे - विजय भास्कर निळ हे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. निमगाव येथील जुन्या प्रस्थापितांना मागे सारून पुन्हा एकदा "तिसरी आघाडी" म्हणून ओळखला जाणाऱ्या जुन्या गटातील नव्या पिढीने जुन्या नव्यांचा मेळ घालून जेष्ठ नेते विठ्ठल बापू जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी सक्रिय करून विजय मिळवल्याने हि निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे. ग्रामपंचायत निवडणूक काही महिन्यावर असताना या निवडणुकीला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.या सोसायटीचे ३८२ मतदार असून ३२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता सर्व विजयी उमेदवारांचे माजी आमदार जयवंतराव जगताप, आमदार नारायण आबा पाटील यांनी अभिनंदन केले आहे
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी

संत शेख महंमद व संत तुकाराम यांच्यावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन

घरगुती वादाचा राग मनात धरून. भाच्यानेच मामाच्या डोक्यात दगड घालुन केला खुन. यवत येथील धक्कादायक घटना.