अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

By : Polticalface Team ,27-05-2025

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला ता. इंदापूर | जन आधार न्यूज | प्रतिनिधी - भिमसेन जाधव | मो. 9112131616 काल झालेल्या मुसळधार पावसामुळे बारामतीकडून अकलूजकडे जाणाऱ्या मार्गावर, कळंब आणि चिखली दरम्यान असलेल्या पुलावरून पाण्याचा प्रचंड प्रवाह सुरू होता. या जोरदार प्रवाहात दुधाचा एक टँकर अडकला. टँकरमध्ये अकलूज (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील सुनिता सिकंदर साठे (वय 38) आणि त्यांचा मुलगा कार्तिक सिकंदर साठे (वय 10) अडकले होते. याशिवाय, टँकरचा चालक आणि कळंब येथील ग्रामस्थ तानाजी कदम, अमोल डोंबळे व सोमनाथ जमदाडेही या घटनेत अडकल्याची माहिती मिळताच, वालचंदनगर पोलीस स्टेशनचे पोलिस हवालदार महेश पवार, विकास निर्मळ आणि हरिश्चंद्र जगताप यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या धाडसी पोलिसांनी कोणताही विलंब न करता पाण्याच्या प्रचंड प्रवाहात जाऊन सर्वांना सुखरूप बाहेर काढले. या कार्यवाहीमुळे मोठा अनर्थ टळला असून, पोलिसांचे धाडस आणि तत्परता सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे. स्थानिक ग्रामस्थांनीही या बचावकार्यात पोलिसांना मोलाची मदत केली. संपूर्ण घटनेमुळे पुन्हा एकदा आपत्ती काळात पोलीस आणि नागरिकांचे समन्वय किती महत्त्वाचा असतो हे अधोरेखित झाले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी

संत शेख महंमद व संत तुकाराम यांच्यावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन

घरगुती वादाचा राग मनात धरून. भाच्यानेच मामाच्या डोक्यात दगड घालुन केला खुन. यवत येथील धक्कादायक घटना.