दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
By : Polticalface Team ,01-06-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ०१ जुन २०२५ दौंड शहरात सत्तेतील दोन पक्षा कडूनच श्रेय वादाची लढाई दौंड शहरातील जनता मात्र घाणीच्या त्रासाने हतबल झाली आहे मात्र दोन्ही सत्ता धारी गट दौंड नगरपालिकेला पुर्ण वेळ मुख्याधिकारी देण्यास असमर्थ ठरले आहेत उपमुख्याधिकारी हे काल पर्यन्त होते भले ते काम करत नव्हते पण शेतातील बुजगावण्या प्रमाणे तरी होते. तेही काल सेवा निवृत्त झाले आहे. अत्ता दौंड नगरपालिकेला वाली उरला नाही. हया मोठ्या समस्येकडे दोन्ही श्रेय वादाची लढाई करणारे दौंड तालुक्याचे आमदार राहूल कूल व शिंदे गटाचे पुणे जिल्हा अध्यक्ष महेश पासलकर गप्प कसे अशी चर्चा दौंड शहरातील चौका चौकात चहाच्या टपरीवर रंगू लागली आहे.
काल शिंदे गटाचे पुणे जिल्हा अध्यक्ष महेश पासलकर यांनी दौंड शहर बस आगार साठी प्रथमच नवीन कोरी पाच बस मिळाल्या त्याचे पेढे वाटून उदघाटन केले तर आज दौंड तालुक्याचे आमदार राहूल कूल यांनी बस चालक व वाहक यांना पुष्पगुच्छ देऊन उदघाटन केले. हे तालुक्यातील जनतेने पाहिले आहे
१९९५ मध्ये बस आगार व बस डेपोची सुरवात झाली त्यावेळेसचे मुख्यमंत्री मा.शरद पवार यांनी उद्घाटन केले होते त्या वेळेस सुद्धा दौंड आगार यांना नवीन बस मिळाल्या नव्हत्या दौंड चे बस स्थानक हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे आसलेले बस स्थानक होते आज ते बस स्थानक खिंडार झाले आहे. हयाचे श्रेय कोण घेताना दिसत नाही. चांगले झाले तर मी केलं आणि वाईट झाले तर मला माहीत नाही? अशी परिस्थिती दौंड तालुक्यात नाकारता येणार नाही अशी देखील चर्चा सुरू झाली आहे
एक महिना उलटून गेला पण शिंदे गट आणि आमदार यांना पुर्ण वेळ दौंड नगरपालिकेला मुख्याधिकारी देता येत नाही. हया सत्ता धारी यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आहे. तेही गप्प आहेत.
श्रेय घेण्यासाठी येणारे नेते चूक सुधारणेसाठी किंवा जनतेच्या भल्यासाठी का? पुढे येत नाहीत बस नवीन आली तर उदघाटन करण्यासाठी प्रथम रस दाखवणारे शिंदे गट व भाजपा आमदार राहूल कूल अजित पवार गट हे का सांगत नाही ( बस हे एसटी महामंडळाने दिल्या आहे ) आमचा सबंध नाही. दौंड शहरातील कचरा संदर्भात विचारले तर नगरपालिका जबाबदार असल्याचे बोलले जाते चांगले झाले तर मी केलं आणि चांगले करता आले नाही तर ते आमचे काम नाही कचरा आणि गटरीचे काम नगरपालिकेचे आहे हे सांगतात मात्र दौंड नगरपालिकेला जबाबदार अधिकारी नाही याला जबाबदार कोण ? बस चे उदघाटन करताना दौंड शहरातील घाणीचे ढीगारे हया दोन्ही गटाच्या नेते मंडळींना का दिसले नाहीत ?
दौंड शहरात एकच चर्चा सुरू झाली आहे आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुकीत दौंड ची जनता सत्ताधाऱ्यांना जागा दाखवल्या शिवाय गप्प बसणार नाही.
(कोणी दौंड नगरपालिकेला पुर्ण वेळ मुख्याधिकारी देता का ?)
पॅथर जयदीप बगाडे न्यू महाराष्ट्र पॅथर सेना महाराष्ट्र राज्य व अध्यक्ष माहिती अधिकार कार्यकर्ता व पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
वाचक क्रमांक :