संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांना DBT प्रणाली अंमलात न आल्याने लाभ अडकले; वंचित बहुजन युवा आघाडीचे तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

By : Polticalface Team ,04-06-2025

संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांना DBT प्रणाली अंमलात न आल्याने लाभ अडकले; वंचित बहुजन युवा आघाडीचे तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

भिमसेन जाधव मो.9112131616 जन आधार न्युज पुणे/बारामती             दि. २ जून २०२५:


संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना या राज्य शासनाच्या महत्वाच्या योजनांतर्गत लाभार्थ्यांना आर्थिक मदत थेट बँक खात्यात (DBT प्रणाली) मिळण्याची प्रक्रिया अद्याप कार्यान्वित न झाल्यामुळे लाभार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी बारामती उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन सादर करून त्वरित ही प्रक्रिया ऑनलाइन करून लाभार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.


या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अनेक जेष्ठ नागरिक, अपंग, विधवा, परित्यक्ता महिलांनी महिन्यांपासून या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र बँक खात्यांशी संलग्न DBT प्रणाली अद्याप कार्यरत नसल्याने त्यांना पैसे मिळालेले नाहीत. यामुळे गरजू लाभार्थ्यांच्या जीवनावश्यक गरजा भागवणे कठीण झाले आहे.


निकाळजे यांनी सांगितले की, काही लाभार्थ्यांना औषधोपचार, किराणा व इतर दैनंदिन गरजांसाठी पैसे नसल्याने उपासमार होते आहे. प्रशासनाने वेळ न घालवता DBT प्रणाली तत्काळ कार्यान्वित करावी, अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडी याविरोधात तीव्र आंदोलन उभारेल, असा इशाराही त्यांनी दिला.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

मढेवडगाव येथे वृक्ष संवर्धन आणि समतेचा संदेश देत गावकऱ्यांनी साजरी केली बकरी ईद..

सावधान! तुमच्या नावावर परक्याचं SIM वापरलं जातंय का? फक्त मोबाईल नंबर टाका… आणि जाणून घ्या किती सिम आहेत तुमच्या नावावर!

प्रभाग रचना विरोधात सर्व पक्षीय बैठक बारामतीत संपन्न — जनआंदोलनाची तयारी

मा. पोलीस अधिक्षक, श्री. अतुल कुलकर्णी यांच्या विकसीत गाव योजनेचा शुभारंभः - करमाळा तालुक्यातील सहा गावांना घेतले दत्तक फिसरे गावामध्ये सेंद्रीय शेती व जलतारा प्रकल्पाच्या कार्यशाळेचे आयोजन.

दिनांक सात जून रोजी बकरी ईद ची नमाज इदगाह मैदानावर आठ वाजता होणार,,,,,,,, कलीम काझी सर

खडकी गावातील बस स्टॉपला गाडी का? थांबवत नाही. एसटी वाहक चालकास शिवीगाळ मारहाण केल्या प्रकरणी 7 इस्मान विरुद्ध गुन्हा दाखल

संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांना DBT प्रणाली अंमलात न आल्याने लाभ अडकले; वंचित बहुजन युवा आघाडीचे तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

यवत गावची बाजार पेठ उंचावण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून गाव कारभारी यांनी प्रयत्न केला पाहिजे.

राजेंद्र दादा नागवडे व सौ नागवडे यांच्या विशेष प्रयत्नातून घरकुल प्रकल्पास राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान

राज्यस्तरीय तबला स्पर्धेत श्रेयस सोनटक्के प्रथम; थायलंडसाठी निवड

वसुंधरा बचाव अभियानचा स्तुत्य उपक्रम* लोणी व्यंकनाथ येथे मान्यवरांचा वृक्ष भेट देऊन सन्मान. , सामाजिक एकतेचा संदेश देणारा अद्वितीय उपक्रम

अखेर वृत्त प्रसिद्ध होताच महावितरणकडून वीज ग्राहकाचा विलंब दंड संबंधित एजन्सीच्या नावे

हरिश्चंद्र शिंदे यांचे आर एस पी अधिकारी पदाचे प्रशिक्षण पूर्ण.

डॉ. राजेंद्र प्रसाद विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची तब्बल पंधरा वर्षानंतर गळाभेट

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला