मुंबईत डान्सबारचा परदाफार्श, तळघरात विशेष सुविधा पाहून पोलीस झाले थक्क

By : Polticalface Team ,19-12-2022

मुंबईत डान्सबारचा  परदाफार्श, तळघरात विशेष  सुविधा पाहून पोलीस झाले थक्क

मुंबई पोलिसांनी दहिसर भागात एक मोठी कारवाई केली आहे. दहिसर भागात असलेल्या एका रेस्तराँवर छापेमारी करत डान्स बारचा पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी 17 तरुणींना ताब्यात घेतले आहे तर 19 ग्राहक आणि रेस्ट्रॉच्या मॅनेजरसह एकूण 25 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या सामाजिक शाखेने गोपनिय माहितीच्या आधारे शनिवारी ही कारवाई केली. या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अनेक महिला-पुरुषांना ताब्यात घेतलं आहे तर रेस्टो्रॉ मॅनेजरसह 6 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. सगळ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दहिसर येथील एका रेस्तराँवर अचानक छापेमारी केली. रेस्तराँ मालकाने डान्स बारसाठी तळमजल्यावर विशेष सुविधा केली होती. पोलिस तळमजल्यात पोहोचले तेव्हा तेथील दृष्य पाहून थक्क झाले. तळघरात 17 तरुणी आणि 19 ग्राहक आढळून आले. सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अनेक पुरुषांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहिसर पोलिसांच्या सामाजिक शाखेने ही कारवाई केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले, की पोलिस रेस्तराँमध्ये पोहोचले तेव्हा डान्स फ्लोअरवर केवळ चारच महिला डान्स करत होत्या. मात्र, 17 महिला आणि 19 ग्राहक विशेष पद्धतीने तयार करण्यात आलेल्या तळघरात आढळून आले. पोलिसांनी 17 महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर आरोपींविरुद्ध भादंविनुसार विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, सध्या मुंबईसह उपनगरात गुन्हेगारीत वाढ झाल्याचे चित्र आहे. मुंबई पोलिसांनी यापूर्वी देखील मुंबईतील अनेक भागात अशाप्रकारे कारवाई केली होती. त्यात अनेक डान्स बार आणि रेव्ह पार्टीजचा समावेश होता. अनेक तरुण तरुणींवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई देखील केली आहे. ड्रग्स पार्टी तर सध्या पोलिसांच्या टार्गेटवर आहे. ड्रग्स पेडलर आणि बॉलिवूड कनेक्शन देखील काही दिवसांपूर्वी चर्चेत होते.
प्रकाश म्हस्के
संपादक

कोहलेर पावर इंडिया कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून इंदिरा गांधी पॉलिटेक्निक बेलवंडी (शुगर) ५० कॉम्प्युटर, लॅपटॉप, वॉटर कुलर व मोठे झेरॉक्स मशीन भेट.

स्वर्गीय आमदार सुभाष आण्णा कुल यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत आहे. आमदार राहुल कुल.

एनडीए सरकारच्या वाचाळवीरांवर तात्काळ गुन्हे दाखल करा:- युवक काँग्रेस

सहकार महर्षी बापूंनी सहकाराच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुका सुजलाम सुफलाम केला - प्रसिद्ध व्याख्याते गणेशजी शिंदे

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी सोलापुरात! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा; 40,000 महिलांना कार्यक्रमासाठी आणायला 400 बसगाड्या

स्वामी चिंचोली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

वडगाव शेरी मतदार संघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे, त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे व तीन माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत

शरद पवारही माझ्याकडे बघून हसू लागले; अशोक सराफांनी सांगितला सुप्रिया सुळेंच्या लग्नातला विनोदी किस्सा

स्वर्गीय सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांच्या पुण्यस्मरणानिमित्त उद्या वांगदरी येथील अंबिका मातेचे मंदिरात व्याख्यान        

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राज्य निरीक्षक पदी भानुदास वाबळे यांची नियुक्ती

यवत येथील गणेश विसर्जन मिरवणूकीत कार्यकर्ते झिंग झिंगाट. मंडळांच्या प्रमुखांनमुळं विसर्जन पार. पोलीस प्रशासनाचे नियम धाब्यावर. मागच्या दाराने दारु विक्री

गिरीम गावच्या सरपंचपदी संगिता किसन मदने (पाटील)यांची बिनविरोध निवड

पो. कॉ.ज्ञानेश्वर मोरेच्या रुपात खाकीतला एक कोहिनूर हरपला

अजितदादांनी या मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद

इंदापूरमध्ये शरद पवारांकडून उमेदवारीसाठी आप्पासाहेब जगदाळे यांच्या समर्थकांच्या हालचाली.! संकटसमई धावून आलेल्या आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी मिळणार..?

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात पहा तारीख आणि वेळ

अरविंद केजरीवाल देणार राजीनामा, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण होणार विराजमान

पितृसेवा म्हणजेच भगवंताची उत्तम सेवा होय -सोमनाथ महाराज बारगळ

श्री व्यंकनाथ विद्यालयात शिक्षक- पालक मेळावा उत्साहात संपन्न