सहकार महर्षी बापूंनी सहकाराच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुका सुजलाम सुफलाम केला - प्रसिद्ध व्याख्याते गणेशजी शिंदे

By : Polticalface Team ,19-09-2024

सहकार महर्षी बापूंनी सहकाराच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुका सुजलाम सुफलाम केला - प्रसिद्ध व्याख्याते गणेशजी शिंदे

    लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्याचे भाग्यविधाते नागवडे कारखान्याचे संस्थापक माजी आमदार सहकार महर्षी दिवंगत शिवाजीराव नागवडे बापू यांनी श्रीगोंदा या दुष्काळी तालुक्याला सहकार चळवळीच्या माध्यमातून ऊर्जित अवस्थेत आणून श्रीगोंदा तालुका सुजलाम सुफलाम केला असल्याचे गौरवोद्गार प्रसिद्ध व्याख्याते गणेशजी शिंदे यांनी आयोजित पुण्यस्मरण कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. 

       सहकार महर्षी दिवंगत शिवाजीराव नागवडे बापू यांचे सहावे पुण्यस्मरण वांगदरी येथील ग्रामदैवत अंबिका माता मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी सहकार महर्षी बापूंच्या कार्य कर्तुत्वावर स्तुती सुमने वाहत; बापू हे राज्यातील सहकार क्षेत्रातील ऋषिकुल्य व्यक्तिमत्व होते. सहकार महर्षी बापूंचे अखेरच्या श्वासापर्यंत 84 वय असताना तब्बल 65 वर्ष  सर्वसामान्यांचे हित जोपासले असे सांगून श्री शिंदे यावेळी पुढे म्हणाले की; बापूंनी कष्टकरी शेतकऱ्यांच्या हितासाठी या दुष्काळी तालुक्याला मोठ्या संघर्षातून भरीव योगदान देत तालुका सुजलाम सुफलाम केला. त्यामुळे बापूंनी तालुक्याचा विकास साधताना सहकारातून समृद्धीकडे तालुक्याला समृद्धीच्या वाटेवर नेऊन ठेवला. सहकार; सिंचन; कृषी; शिक्षण या क्षेत्राला बळकटी देत आज हा तालुका सहकार महर्षी बापूंच्या संघर्षामुळेच सर्व क्षेत्रात अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही असे सांगत व्याख्याते शिंदे यांनी सहकार महर्षी बापूंचे कार्य हे दीपस्तंभ सारखे होते. अशा या गुणवंत किर्तीवंत बापूंच्या स्मृतीला उजाळा देणे हे आपणा सर्वांचेच आद्य कर्तव्य आहे.

        सहकार महर्षी बापूंना पुष्पांजली वाहताना व्याख्याते शिंदे आणखी पुढे म्हणाले की; सहकार महर्षी बापूंनी तालुक्याचा सर्वांगीण विकासाचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवत १९६५ साली या खाजगी कारखान्याचे सहकारी तत्त्वावर रूपांतर करताना किती संघर्षातून ही सहकार चळवळ उभारली असेल याची तुलना होणे कठीण आहे. या सहकारी चळवळीमुळेच लाखो लोकांचे प्रपंच फुलले आहेत हे केवळ बापूंच्या दूरदृष्टीमुळेच शक्य झाले आहे. सामाजिक विकास घडवून आणायचा असेल तर सहकाराशिवाय  पर्याय नाही. बापूंनी तेच तत्व डोळ्यासमोर ठेवून महान कार्य पार पाडले. बापूंना राजकीय क्षेत्रात अनेक चढउतार आले परंतु बापू कणभरही डगमगले नाहीत सत्तेपेक्षा समाजसेवेला बापूंनी अधिक महत्त्व दिले. आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये बापूंनी सर्वसामान्यांशी अतूट नाते जोडले. कष्टकरी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अहोरात्र कष्ट घेतले. आणि तोच बापूंचा वारसा आज नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे; जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुराधाताई नागवडे;  युवा नेते दीपक शेठ नागवडे हे खंबीरपणे चालवत आहेत. तालुक्याच्या भरभराटीसाठी आपण सर्वांनीच नागवडे कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून साथ देण्याची आवश्यकता असल्याचे शिंदे यांनी सांगत ते आणखी पुढे म्हणाले की; काळ आणि वेळेनुसार आपण बदललो तर जीवनाला उत्तम दिशा मिळेल; सहकार महर्षी बापूंनी तेच तत्व आपल्या जीवनात पाळले आहे. म्हणूनच तालुक्याचे नंदनवन झाल्याचे शिंदे यांनी सांगितले.

      जीवनाचा मंत्र सांगताना व्याख्याते शिंदे पुढे म्हणाले की; माणसाचे आयुष्य किती क्षणभंगुर आहे. मनुष्य जन्माला येताना नऊ महिने समजते. परंतु जाताना मात्र कळत नाही हा निसर्गाचा नियम आहे. निसर्गाने खूप सुंदर जीवन जगण्यासाठी दिलेले आहे. त्यामुळे निसर्गासोबत जुळून घेतलं तर जीवन सुंदर होईल. निसर्गाने मात्र पात्रता दाखवून दिलेले आहे. त्याचे पालन करण्याची आवश्यकता आहे. आपणाकडे पैसे भरपूर येतील परंतु आरोग्य शिल्लक राहणार नाही याची खबरदारी ही सर्वांनी घ्यावी असे सांगत श्री शिंदे यांनी निसर्ग समाज आणि अर्थकारण याविषयी सहकार महर्षी बापूंच्या पुण्यस्मरणानिमित्त उपस्थिततांना भरीव असे मार्गदर्शन केले. यावेळी तालुक्यातील अनेक मान्यवरांनी बापूंच्या कार्याला उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली.

          या सोहळ्यास नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे; उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस; माजी आमदार राहुल जगताप; जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. अनुराधाताई नागवडे; विठ्ठलराव नागवडे; आहे उत्तमराव नागवडे; शहाजी काका नागवडे; दीपक शेठ नागवडे; पृथ्वीराज नागवडे; घनश्याम शेलार; केशवराव मगर; प्रेमराज भोईटे; भुजंगराव नागवडे; डॉ. दत्तात्रय नागवडे; दीपक भोसले; रामचंद्र नागवडे; सरपंच संजय नागवडे; स्मितल वाबळे,सुभाषराव शिंदे, जिजाबापू शिंदे; गणपतराव काकडे; राम अण्णा नागवडे; नागवडे आदेश नागवडे कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे; ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे निरीक्षक बी के लगड सर; छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड सर आदींसह नागवडे कारखान्याचे आजी-माजी संचालक तसेच तालुक्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

         सूत्रसंचालन भाऊसाहेब बांदल यांनी केले. ऋणनिर्देश व उपस्थित मान्यवरांचे आभार नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी मानले.

प्रकाश म्हस्के
संपादक

कोहलेर पावर इंडिया कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून इंदिरा गांधी पॉलिटेक्निक बेलवंडी (शुगर) ५० कॉम्प्युटर, लॅपटॉप, वॉटर कुलर व मोठे झेरॉक्स मशीन भेट.

स्वर्गीय आमदार सुभाष आण्णा कुल यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत आहे. आमदार राहुल कुल.

एनडीए सरकारच्या वाचाळवीरांवर तात्काळ गुन्हे दाखल करा:- युवक काँग्रेस

सहकार महर्षी बापूंनी सहकाराच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुका सुजलाम सुफलाम केला - प्रसिद्ध व्याख्याते गणेशजी शिंदे

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी सोलापुरात! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा; 40,000 महिलांना कार्यक्रमासाठी आणायला 400 बसगाड्या

स्वामी चिंचोली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

वडगाव शेरी मतदार संघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे, त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे व तीन माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत

शरद पवारही माझ्याकडे बघून हसू लागले; अशोक सराफांनी सांगितला सुप्रिया सुळेंच्या लग्नातला विनोदी किस्सा

स्वर्गीय सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांच्या पुण्यस्मरणानिमित्त उद्या वांगदरी येथील अंबिका मातेचे मंदिरात व्याख्यान        

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राज्य निरीक्षक पदी भानुदास वाबळे यांची नियुक्ती

यवत येथील गणेश विसर्जन मिरवणूकीत कार्यकर्ते झिंग झिंगाट. मंडळांच्या प्रमुखांनमुळं विसर्जन पार. पोलीस प्रशासनाचे नियम धाब्यावर. मागच्या दाराने दारु विक्री

गिरीम गावच्या सरपंचपदी संगिता किसन मदने (पाटील)यांची बिनविरोध निवड

पो. कॉ.ज्ञानेश्वर मोरेच्या रुपात खाकीतला एक कोहिनूर हरपला

अजितदादांनी या मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद

इंदापूरमध्ये शरद पवारांकडून उमेदवारीसाठी आप्पासाहेब जगदाळे यांच्या समर्थकांच्या हालचाली.! संकटसमई धावून आलेल्या आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी मिळणार..?

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात पहा तारीख आणि वेळ

अरविंद केजरीवाल देणार राजीनामा, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण होणार विराजमान

पितृसेवा म्हणजेच भगवंताची उत्तम सेवा होय -सोमनाथ महाराज बारगळ

श्री व्यंकनाथ विद्यालयात शिक्षक- पालक मेळावा उत्साहात संपन्न