By : Polticalface Team ,19-09-2024
दौंड (प्रतिनिधी) शिबिरामध्ये ५७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. भिगवन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि ग्रामपंचायत स्वामी चिंचोली यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर दरम्यान एकूण ५७रुग्णांची तपासणी करण्यात आली.यामध्ये मोफत ई सी जी,काढण्यात आले.रक्तदाब हिमोग्लोबिन अशा विविध तपासण्या करण्यात आल्या.गावातील काही रुग्ण विविध आजाराने त्रस्त आहेत.चालू असलेले उपचार औषधे याविषयी महिती जाणून घेऊन योग्य सल्ला देण्यात आला.गोळ्यांनी होणारे दुष्परिणाम याविषयी महिती देण्यात आली.यावेळी हॉस्पिटलचे डॉ.वेदपाठक, डॉ.यादव त्यांचे सहकारी व स्टाफ यावेळी उपस्थित होते.गावच्या सरपंच सौ.पुनम मदने यांनी शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.ग्रामस्थांच्या सहकार्याने संपूर्ण शिबिर उत्साहात पार पडले यावेळी ग्रामसेविका स्वाती लोंढे याही उपस्थित होत्या