पितृसेवा म्हणजेच भगवंताची उत्तम सेवा होय -सोमनाथ महाराज बारगळ

By : Polticalface Team ,17-09-2024

पितृसेवा म्हणजेच भगवंताची उत्तम सेवा होय -सोमनाथ महाराज बारगळ

    लिंपणगाव( प्रतिनिधी)- पितृसेवा म्हणजेच भगवंताची उत्तम सेवा होय पितृ सेवा करणे हे आपले सर्वांचे आद्य कर्तव्य असल्याचे भावनिक उद्गार ह भ प सोमनाथ महाराज बारगळ यांनी आयोजित कीर्तन सेवेत व्यक्त केले. 

    नागवडे कारखान्याचे सेवानिवृत्त कामगार दिवंगत मारुती वाल्हेकर यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्त सोमनाथ महाराज बारगळ यांची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थित भाविकांना भावनिक सल्ला देताना बारगळ महाराज पुढे म्हणाले की; प्रथम वर्ष श्राद्ध म्हटले की; त्या मृत आत्म्याचा मुक्ती दिन समजला जातो. तो हिंदू धर्मानुसार सर्वात श्रेष्ठ पर्वकाळ समजला जातो. संसारी माणसाने देव देवतांसह पितृदेवाला विसरता कामा नये  किमान आपल्या कुटुंबीयांतील तीन पिढ्यांपर्यंत मानपान ठेवला पाहिजे. घरातील पितृ हरपले असले तरी त्याचे लक्ष संपूर्ण आपल्या परिवाराकडे असते. असे शास्त्र सांगते असे देखील बारगळ महाराज यांनी आवर्जून सांगितले. 

      आणखी पुढे बोलताना बारगळ महाराज म्हणाले की; माणूस गेला म्हणून सर्वकाही संपले असे कोणीही समजू नये. म्हणूनच पितृदोष मागे लागतो. याची जाणीव सर्वांनाच हवी. म्हणूनच पितृसेवा म्हणजे भगवंताची सेवा समजली जाते. त्यामुळे घरातील व्यक्ती मृत पावल्यास त्यांचा विसर होता कामा नये. दुःखाचे मूळ कारण अज्ञान आहे. जोपर्यंत अज्ञान असाल तर सुज्ञानी माणसाकडून योग्य मार्गदर्शन घ्यावे. अंत्यविधी हा सोळा संस्कार विधी समजला जातो. ज्यांनी जन्माचा सोहळा केला त्याचा अंत्यविधीला सोहळा घालावाच लागतो. त्यासाठी जीवनामध्ये प्रत्येकाने मनोभावे भक्ती करत भगवंतांचे चिंतन; नामस्मरण व भगवंताला शरण जायला हवे; त्यातून आपल्या जीवनाचे हित व सोने करावे; बारगळ महाराज आणखी पुढे म्हणतात की; मानवाला परत परत हा जन्म मिळत नाही. हरीनामात खरी ताकद आहे. जन्म दिलेला आहे तो वाया जाऊ देऊ नका; सर्व जन्मांमध्ये मानवाचा सर्वश्रेष्ठ जन्म आहे; असे सांगून बारगळ महाराज यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. 

        या सोहळ्यास नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे संचालक सुभाषराव शिंदे विठ्ठलराव जंगले राकेश पाचपुते भाजपा नेत्या सुवर्णाताई पाचपुते संस्थेचे चेअरमन राजेंद्र कुरुमकर व्हाईस चेअरमन मधुकर होले लक्ष्मण भोईटे दादाजी घोंडगे सर सिद्धेश्वर सेवा संस्थेचे चेअरमन प्रवीण कुरुमकर  जयसिंग शेंडे  रवींद्र भोंडवे सर ईश्वर रेवगे सर आदींसह लिंपणगाव पंचक्रोशीतील मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता सूत्रसंचालन दादा कुरुमकर यांनी केले

प्रकाश म्हस्के
संपादक

कोहलेर पावर इंडिया कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून इंदिरा गांधी पॉलिटेक्निक बेलवंडी (शुगर) ५० कॉम्प्युटर, लॅपटॉप, वॉटर कुलर व मोठे झेरॉक्स मशीन भेट.

स्वर्गीय आमदार सुभाष आण्णा कुल यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत आहे. आमदार राहुल कुल.

एनडीए सरकारच्या वाचाळवीरांवर तात्काळ गुन्हे दाखल करा:- युवक काँग्रेस

सहकार महर्षी बापूंनी सहकाराच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुका सुजलाम सुफलाम केला - प्रसिद्ध व्याख्याते गणेशजी शिंदे

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी सोलापुरात! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा; 40,000 महिलांना कार्यक्रमासाठी आणायला 400 बसगाड्या

स्वामी चिंचोली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

वडगाव शेरी मतदार संघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे, त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे व तीन माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत

शरद पवारही माझ्याकडे बघून हसू लागले; अशोक सराफांनी सांगितला सुप्रिया सुळेंच्या लग्नातला विनोदी किस्सा

स्वर्गीय सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांच्या पुण्यस्मरणानिमित्त उद्या वांगदरी येथील अंबिका मातेचे मंदिरात व्याख्यान        

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राज्य निरीक्षक पदी भानुदास वाबळे यांची नियुक्ती

यवत येथील गणेश विसर्जन मिरवणूकीत कार्यकर्ते झिंग झिंगाट. मंडळांच्या प्रमुखांनमुळं विसर्जन पार. पोलीस प्रशासनाचे नियम धाब्यावर. मागच्या दाराने दारु विक्री

गिरीम गावच्या सरपंचपदी संगिता किसन मदने (पाटील)यांची बिनविरोध निवड

पो. कॉ.ज्ञानेश्वर मोरेच्या रुपात खाकीतला एक कोहिनूर हरपला

अजितदादांनी या मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद

इंदापूरमध्ये शरद पवारांकडून उमेदवारीसाठी आप्पासाहेब जगदाळे यांच्या समर्थकांच्या हालचाली.! संकटसमई धावून आलेल्या आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी मिळणार..?

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात पहा तारीख आणि वेळ

अरविंद केजरीवाल देणार राजीनामा, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण होणार विराजमान

पितृसेवा म्हणजेच भगवंताची उत्तम सेवा होय -सोमनाथ महाराज बारगळ

श्री व्यंकनाथ विद्यालयात शिक्षक- पालक मेळावा उत्साहात संपन्न