स्वर्गीय आमदार सुभाष आण्णा कुल यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत आहे. आमदार राहुल कुल.

By : Polticalface Team ,20-09-2024

स्वर्गीय आमदार सुभाष आण्णा कुल यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत आहे. आमदार राहुल कुल.

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड तालुक्यातील बोरीपर्धी चौफुला ता दौंड जिल्हा पुणे येथील श्री बोरमलनाथ मंदिर या ठिकाणी आमदार अँड राहुल कुल यांच्या संकल्पनेतून महाआरोग्य शिबीर दि १९ सप्टेंबर २०२४ रोजी घेण्यात आले. नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी असून मी गेल्या दहा वर्षात आरोग्य कामांसाठी प्रयत्न करत असल्याचे आमदार अँड राहुल कुल यांनी बोलताना सांगितले ते बोरीपर्धी (ता. दौंड) येथील बोरमलनाथ मंदीर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरात बोलत होते. यावेळी बोलताना आमदार कुल म्हणाले की, स्वर्गीय आमदार सुभाष आण्णा कुल यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत असताना दौंड तालुक्याचा आमदार झाल्या पासून आरोग्याच्या बाबतीत काम करण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या दहा वर्षात आरोग्याच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात काम करण्यात मला माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने यश आलं आहे तसेच कोरोना कालावधीत देखील आम्ही मोठं काम उभे केले परंतु त्याची कुठेही प्रसिद्धी केली नाही. यापुढील काळात देखील आरोग्यसेवेला प्राधान्य देण्यात येणार असून या आरोग्य शिबिरात आलेल्या प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार मिळेपर्यंत आम्ही सर्वजण त्याचा पाठपुरावा करू असे त्यांनी सर्व रुग्णांना अश्वस्त केले. या शिबिरात सुमारे १३ हजार ८०० रुग्णांची नोंदणी व तपासणी झाली असून, तपासणी ते संपूर्ण उपचार आशा प्रकारचे हे शिबिर आहे. पुण्यातील ५० हुन अधिक नामांकित हॉस्पिटलांनी या महाआरोग्य शिबिरात सहभाग घेतला होता. यामध्ये सुमारे ३००० हुन अधिक नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. सुमारे ८०० दिव्यांगाना आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले. या महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दीपक जाधव यांनी केले. यावेळी माजी आमदार रंजना कुल, कांचन कुल. माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, भिमा पाटसचे कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, माऊली ताकवणे. धनाजी शेळके, तुकाराम ताकवणे, हरिभाऊ ठोंबरे, धर्मदाय आयुक्त दिलीप देशमुख. प्रांताधिकारी मिनाज मुल्ला. तहसीलदार अरुण शेलार. उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, दौंडचे पोलीस निरीक्षक संतोष डोके व इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भाजपाचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे यांनी केले तर आभार उमेश देवकर यांनी मानले .

कोहलेर पावर इंडिया कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून इंदिरा गांधी पॉलिटेक्निक बेलवंडी (शुगर) ५० कॉम्प्युटर, लॅपटॉप, वॉटर कुलर व मोठे झेरॉक्स मशीन भेट.

स्वर्गीय आमदार सुभाष आण्णा कुल यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत आहे. आमदार राहुल कुल.

एनडीए सरकारच्या वाचाळवीरांवर तात्काळ गुन्हे दाखल करा:- युवक काँग्रेस

सहकार महर्षी बापूंनी सहकाराच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुका सुजलाम सुफलाम केला - प्रसिद्ध व्याख्याते गणेशजी शिंदे

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी सोलापुरात! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा; 40,000 महिलांना कार्यक्रमासाठी आणायला 400 बसगाड्या

स्वामी चिंचोली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

वडगाव शेरी मतदार संघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे, त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे व तीन माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत

शरद पवारही माझ्याकडे बघून हसू लागले; अशोक सराफांनी सांगितला सुप्रिया सुळेंच्या लग्नातला विनोदी किस्सा

स्वर्गीय सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांच्या पुण्यस्मरणानिमित्त उद्या वांगदरी येथील अंबिका मातेचे मंदिरात व्याख्यान        

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राज्य निरीक्षक पदी भानुदास वाबळे यांची नियुक्ती

यवत येथील गणेश विसर्जन मिरवणूकीत कार्यकर्ते झिंग झिंगाट. मंडळांच्या प्रमुखांनमुळं विसर्जन पार. पोलीस प्रशासनाचे नियम धाब्यावर. मागच्या दाराने दारु विक्री

गिरीम गावच्या सरपंचपदी संगिता किसन मदने (पाटील)यांची बिनविरोध निवड

पो. कॉ.ज्ञानेश्वर मोरेच्या रुपात खाकीतला एक कोहिनूर हरपला

अजितदादांनी या मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद

इंदापूरमध्ये शरद पवारांकडून उमेदवारीसाठी आप्पासाहेब जगदाळे यांच्या समर्थकांच्या हालचाली.! संकटसमई धावून आलेल्या आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी मिळणार..?

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात पहा तारीख आणि वेळ

अरविंद केजरीवाल देणार राजीनामा, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण होणार विराजमान

पितृसेवा म्हणजेच भगवंताची उत्तम सेवा होय -सोमनाथ महाराज बारगळ

श्री व्यंकनाथ विद्यालयात शिक्षक- पालक मेळावा उत्साहात संपन्न