बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचा प्रवेश सोहळा संपन्न(योगेश मोरे,मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,12-05-2023
मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ):
दिनांक ११.०५.२०२३ रोजी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष संविधान तज्ञ ॲड.डॉ सुरेश माने यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व विजय शिनगारे जिल्हाअध्यक्ष यांच्या हस्ते प्रवेश सोहळा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा शेंनपुंजी रांजणगाव याठिकाणी जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते सागर अंभोरे यांची युवा जिल्हा महासचिव पदी निवड करण्यात आली. यावेळी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी गंगापूर तालुकाध्यक्ष अक्षय बनकर,भगवान गर्दनमारे तालुका सचिव,गंगापूर राहुल जाधव पश्चिम तालुका उपाध्यक्ष, गौतम बनकर तालुकाध्यक्ष कामगार आघाडी,शुभम दुशिंग गंगापूर शहराध्यक्ष,मनोज साळवे वाळुंज महानगर अध्यक्ष,साईनाथ दाभाडे, मारुतीराव बोरगे सामाजिक कार्यकर्ते आदी पदाधिकारी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :