विद्यार्थ्याचा धडावेगळा मृतदेह विहिरीत आढळला(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,13-05-2023
मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ):
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा शिवारातील विहिरीत शीर धडा वेगळे झालेल्या 18 वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत तरंगताना आढळून आला. ही घटना शुक्रवारी पहाटे आठ वाजता उघडकीस आली. अविनाश उर्फ बंटी दगडू तडवी (वय 18, रा. कवली, ता. सोयगाव) असे मृत मुलाचे नाव आहे.
शुक्रवारी पहाटे बहुलखेडा शिवारातील सुरेश परमाने (रा.पिंपळगाव हरे ता. पाचोरा) यांना त्यांच्या गट क्र. 138 मध्ये असलेल्या विहिरीत कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह तरंगताना आढळून आला. याची माहिती त्यांनी कवलीचे पोलिस पाटील निवृत्ती केंडे व बहुलखेड्याचे पोलिस पाटील चंद्रसिंग राठोड यांना दिली. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने शिर गळुन गेल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
यानंतर पोलिस पाटील यांच्या माहितीवरून सोयगावचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केल्यानंतर जागेवरच शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द केला. याप्रकरणी सोयगाव पोलिस ठाण्यात नोंद केली. अधिक तपास पोलिस निरीक्षक अनमोल केदार यांच्या मार्गदर्शनात जमादार राजू बर्डे, रवींद्र तायडे आदी करत आहे.
1 मेपासून घरातून होता बेपत्ता
मृत अविनाश याने नुकतीच बारावीची परीक्षा दिलेली होती. अविनाश हा 1 मेपासून घरातून निघून गेलेला होता. त मित्र आणि नातेवाईकांकडून 10 ते 12 दिवसांपासून त्याचा शोध घेतला जात होता. त्यानंतर गावाजवळ हीखेडा शिवारात विहिरीत त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याची घटना उघडकीस आली. अविनाशच्या मृतदेहाचे घटनास्थळीच शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या उपस्थित जागेवरच अंत्यसंस्कार करण्यात आले.
वाचक क्रमांक :