नातेवाईकाच्या लग्नाला गेलेल्या उद्योजकाचे घर फोडले,सोने लंपास!
By : Polticalface Team ,13-05-2023
मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ):
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात नातेवाईकाच्या लग्नाला गेलेल्या उद्योजकाच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना ११ मे रोजी पहाटे उघडकीस आली. यात आठ तोळे सोने, एक लाख रुपयांची रोकड असा सहा लाख रुपयांपेक्षा अधिकचा ऐवज चोरट्यांनी लंनास केला. ही घटना गुरुसहानीनगर, एन ४, सिडको भागात घडली. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंदविल्याची माहिती निरीक्षक राजश्री आडे यांनी दिली.
उद्योजक दिलीप आबासाहेब पठाडे (रा. अबोली अपार्टमेंट, डी-२, तिरुपती पार्क, गुरुसहानी नगर, एन-४, सिडको) हे योगेश कदम यांच्या घरात किरायाने राहतात. त्यांची शेंद्रा एमआयडीसीत फिल्ड ग्रीप कंपनी आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पत्नीच्या मामाच्या मुलीचे लग्न असल्याने त्यांची पत्नी मुलांसह दोन दिवस आधीच गेली होती. १० मे रोजी दुपारी १२ वाजता घराला कुलूप लाऊन दिलीप पठाडे हे लग्नासाठी ढवळापुरी येथे गेले. लग्नाचा कार्यक्रम आटोपून ते पत्नी, मुलांसह ११ मे रोजी पहाटे ४ वाजता घरी पोहचले. त्यांनी गेटचे कुलूप उघडून घराचे कुलूप उघडण्यासाठी गेले असता दरवाजा उघड दिसला. ते दरवाजा ढकलून आत गेले असता कपाटातील वस्तू अस्थाव्यस्त पडलेल्या दिसून आल्या. घरफोडी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पुंडलिकनगर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली.
हा ऐवज गेला चोरीला
दिलीप पठाडे यांच्या घरातून चोरांनी १३ ग्रॅमचे गंठण, २२ ग्रॅमचे शॉर्ट गंठण, ६.४० ग्रॅमची कर्णफुले, ४.५० गॅमचा कानातील सुईदोरा, ३ तीन ग्रॅमचे टॉप्स, २० ग्रॅमची मुलांची साेनसाखळी, ६ ग्रॅमच्या बाळी, २ ग्रॅमचे ओम, १ ग्रॅमचा कॉईन, ५० हजार रुपये रोकड, २० हजार रुपयांचे चांदीचे जोडवे, ब्रासलेट, चेन आदी दागिने आणि दहा वर्षांपासून जमा केलेला गल्ला, अंदाजे ५० हजार रुपये, असा सहा लाखांहून अधिक रुपयांचा ऐवज चोरीला गेला. अधिक तपास निरीक्षक राजश्री आडे यांच्या मार्गदर्शनात सपोनि. शेषराव खटाने करीत आहेत.
वाचक क्रमांक :
योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष