नाथाची वाडी माटोबा विद्यालयातील सन २००२--१० वी मधिल द्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न
By : Polticalface Team ,21-05-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता.२० मे २०२३, दौंड तालुक्यातील मौजे नाथाची वाडी तालुका दौंड जिल्हा पुणे, येथील
माटोबा विद्यालयातील सन २००२ च्या १० वी मधील विद्यार्थी तब्ब्ल २१ वर्षां नंतर स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने एकत्रित येऊन, दि, १९ मे रोजी मेहेर रिट्रीट साळोबा वस्ती खुटबाव ता दौंड जिल्हा पुणे, या ठिकाणी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते,
पूर्वीप्रमाणे मातोबा विद्यालयात शाळेचा पहिला दिवस असल्याचे दृश्य भासत होते, २१ वर्षा पूर्वीचे सर्व विद्यार्थी आज रांगेत उभे राहून, सर्वप्रथम राष्ट्रगीताने वर्गाची सुरवात झाली. प्रार्थना म्हणत परिपाठ घेण्यात आला, त्या नंतर उपस्थित विद्यार्थ्यांची हजेरी घेण्यात आली. मात्र तब्बल २१ वर्षानंतर पूर्वीचे वर्गमित्राची भेट होत असल्याने प्रत्येकाने आपला स्वतःचा परिचय करून देत असताना अचानक एकच हास्य निर्माण झाले, पूर्वीचे मित्र तत्पूर्वी वडिलांचे नाव किंवा आडनाव घेऊन आवाज देत होते,आता मात्र यामध्ये अधिक सुधारणा झाली असल्याचे दिसून आले, वर्ग शिक्षकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सरस्वती प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले,
या प्रसंगी विष्णूदास दरेकर बोलताना म्हणाले, खरे तर आमच्यासाठी हा क्षण मनाला हेलवणा सुखद धक्का आहे,
विशेष म्हणजे आज आमच्या बरोबर आमचे काही माजी विद्यार्थी उपस्थित आहेत, ते मोठ्या पदावर गेले असल्याने आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो, २१ वर्षानंतर पूर्वीचे आम्ही वर्गमित्र एकत्र आल्याने सर्वांसाठी हा क्षण आनंदाचा व अविस्मरणीय क्षण असल्याचे सांगत या पुढे दरवर्षी माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात यावा, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली, तसेच मातोबा विद्यालयातील
माजी विद्यार्थीनी वृषाली खंडाळे हिने चंद्रा गाण्यावर लावणी नृत्य सादर करुन, पूर्वीप्रमाणे १५ ऑगस्ट स्वातंत्र दिनाच्या व २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात उस्फूर्तपणे सहभाग घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांची कलागुणांची स्तुती करत जुन्या आठवणींना उजाळा दिला,
विष्णुदास दरेकर यांनी शाल व श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन वृषाली खंडाळे हिचा
सत्कार करण्यात आला. या प्रसंगी गुरुजनांकडून सत्कार होणं हा माझ्या आयुष्यातील खूप मोलाचा क्षण असल्याचे वृषाली खंडाळे हिने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली,
माटोबा विद्यालयातील तत्पूर्वीचे दिवंगत शिक्षक व काही विद्यार्थी कोरोना काळात कालबाह्य झाले त्यांना उपस्थित सर्व विद्यार्थ्यांकडून
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, तसेच सन २००२ मधिल १० वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित शिक्षकांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी शिक्षक विष्णुदास दरेकर सर, मेमाणे सर, हाके सर, शिंपणकर सर, काकडे मॅडम, प्रामुख्याने उपस्थित होते,
या स्नेह मेळावा कार्यक्रमाचे नियोजन विजय दोरगे, अंकुश हाके, निर्मला लडकत -लोंढे, अर्चना शितोळे -कोंडे, नितीन धायगुडे, यांनी केले होते.तर संयोजक सूत्रसंचालन संदीप गडदे, कविता शिंदे,अंकुश हाके, यांनी सर्व उपस्थित विद्यार्थी शिक्षकांचे आभार मानले. तसेच स्नेहा इनामके, मोनाली पवार, पुनम नातू, पल्लवी होले, गणेश हाके, भाऊ गायकवाड, संदीप आवाळे श्रीकांत थोरात, स्वाती रासकर, स्वाती मोरे, धनंजय शितोळे, मुकुंद रायकर, महेश दोरगे, राणी रासकर, प्रशांत ढवळे, अविनाश म्हेत्रे, शोभा वळकुंडे, काळूराम बर्वे, या सर्व विद्यार्थीनी पसायदान घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.