रमेश पाटील यांची जनशक्ती शेतकरी संघटनेच्या शहराध्यक्षपदी निवड
By : Polticalface Team ,27-05-2023
मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ):
दि. 27/5/2023 रोजी जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे यांच्या आदेशानुसार छत्रपती संभाजीनगर व नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख अनिल शेळके यांच्या हस्ते रमेश पाटील यांची जनशक्ती शेतकरी संघटना छत्रपती संभाजीनगर शहरअध्यक्षपदी निवड करून नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या व संघटना वाढीसाठी छत्रपती संभाजीनगर शहरात सर्वसामान्यांचे व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण जनशक्ती शेतकरी संघटनेच्या शहरामध्ये वॉर्ड तिथे शाखा स्थापन करुन सर्व सामान्यासाठी काम करावे असे मार्गदर्शन केले.
वाचक क्रमांक :