By : Polticalface Team ,29-05-2023
अजब नगर येथील भीमाबाई लक्ष्णराव बोरसे (७५) क्रांती चौक येथून समता नगरच्या दिशेने सकाळी ६ वाजेच्या सुमारास चालत जात असताना एसबीआय बँकेच्या समोर तोंडाला रुमाल बांधलेले दोन युवक दुचाकीवरून आले. यातील एकाने ओ आजी असा आवाज दिला. त्यामुळे बोरसे या जागीच थांबल्या. तेव्हा जवळ आलेल्या एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मनी असलेली पोत हिसकावली. त्यात १४ ग्रॅम साेन्याचे मणी चोरट्यांच्या हाती लागले.
काही मणी खाली रस्त्यावर पडल्यामुळे वाचले. या घटनेमुळे आजीने आरडाओरड केली. तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. घटनास्थळाला वरिष्ठ अधिकाऱ्यांसह निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक विकास खटके यांच्यासह इतरांनी भेट दिली. वृद्धेचे मंगळसूत्र हिसकावणारे चोरटे नगरच्या दिशेने दुचाकीवरून गेल्याची माहिती पोलिसांना सीसीटीव्हीच्या आधारे समजली. अधिक तपास उपनिरीक्षक खटके करीत आहेत. वाचक क्रमांक :