महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त गुणवंत शिक्षकांचा,मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते सन्मान पुरस्कार

By : Polticalface Team ,01-06-2023

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त गुणवंत शिक्षकांचा,मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते सन्मान पुरस्कार दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता ३१ मे २०२३ महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त, गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद्घाटन मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले, केडगाव चौफुला श्रीकृष्ण गार्डन मंगल कार्यालय ता दौंड जिल्हा पुणे ३१ मे २०२३ रोजी कास्ट्राईब गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण, सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाचे अध्यक्ष गौतम कांबळे, यांनी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने प्रस्तावनेच्या भाषणात विविध महत्त्वाच्या विषयावर उपस्थित मान्यवरांचे लक्ष वेधले या वेळी वसंतराव साळवे, नेते वंचित बहुजन आघाडी, विकास कदम, उपसभापती पंचायत समिती दौंड राज्य सल्लागार कास्ट्राईब शिक्षक महासंघ, आबासाहेब वाघमारे, प्रदेश उपाध्यक्ष बहुजन लोक अभियान,अनेक उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. मा खासदार प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, यांच्या हस्ते गुणवंत शिक्षकांना शाल पुस्तिका सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले, या प्रसंगी मा खासदार प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर बोलताना म्हणाले कास्ट्राईब म्हणजे आर पी आय हे एकच आहे नवीन काय नाही, कामगारांच्या समस्यांना संरक्षण मिळावे यासाठी संघटना अत्यंत आवश्यक आहे, कुठलीही संघटना असो तीला विचारधारा असेल तर चांगल्या प्रकारे संघटना उदयास येऊ शकते, एक विचारधारा अत्यंत महत्त्वाची बाब आहे, मी अनेक ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने जात असतो तेव्हा स्थानिकांकडून फुले शाहू आंबेडकर या विचार सरनीचे आम्ही असल्याचे हे वाक्य वापरताच मला हसू येतं हा माणूस आपल्याशी किती खोटं बोलत आहे, तो स्वतःशीच खोटं बोलत असल्याने अधोगतीच्या मार्गाने जातो, माणसाचे जगण्याचे काही नियम असतात तशाच रीतीने वागण्याचे सुध्दा काही नियम असतात, मी ज्या विचारधारेला मानतो (फुले शाहू आंबेडकर) त्या विचार धारे प्रमाणे माझे आचरण असले पाहिजे, मात्र माझे आचरण (फुले शाहू आंबेडकर) विचारधारेच्या विरुद्धच असते, त्यामुळे घर का ना घाट का ? ज्याचा उपयोग झाला धोबी का कुत्ता, अशी अवस्था निर्माण होते, मी नेहमी सांगत असतो एखाद्या माणसाला स्वतःचं मत असेल तर काळाच्या ओघांमध्ये बरोबर आहे की चूक हे त्याच्या लक्षात येईल, बरोबर असेल तर तो त्या मार्गाने पुढे जाईल, चूक असेल तर दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल, मात्र मतच नसेल तर योग्य मार्गाने जाण्याचा प्रश्नच येत नाही आणि दुरुस्ती करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही, त्यामुळे स्वतःच्या आयुष्यात प्रचंड अडचण निर्माण होते, हा जो सुशिक्षित अधिकारी वर्ग खुर्चीवर बसून नोकरीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना मदत केली असं म्हणत असेल, आज जो खुर्चीवर आहे त्याची जबाबदारी कामगिरी बजावण्याची, उद्या दुसरा कोणीतरी त्या खुर्चीवर असेल, स्वतःची नोकरी असताना एक सामाजिक सेवा असं तो समजायला लागलाय कुटुंबात मुला बाळांना शिक्षण देणे ही एक सामाजिक कार्य असल्याचे मानले जात आहे, हीच सामाजिक कार्याची व्याख्या असेल तर फुले शाहू आंबेडकर यांची गरज च नाही,? त्यांचे विचारच आपल्याला मान्य नाहीत तर विचार करण्याची गरज काय अशी परिस्थिती दिवसेंदिवस निर्माण होत चालली आहे अशा मार्मिक भाषेत मा खासदार प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी आपले विचार व्यक्त केले, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या दुसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून, गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सेवानिवृत्त शिक्षकेत्तर कर्मचारी सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने मा,गौतम कांबळे,राज्य अध्यक्ष, मा,विठ्ठल सावंत राज्यसचिव, मा चंद्रकांत सलवदे, राज्य कार्याध्यक्ष, मा दादासाहेब डाळिंबे, राज्य कोषाध्यक्ष, संतोष ससाने राज्य उपाध्यक्ष, विनोद चव्हाण राज्य प्रवक्ते, तसेच राज्य सल्लागार, दिगंबर जी, वंचित बहुजन आघाडी दौंड तालुका अध्यक्ष अश्विन वाघमारे, आदी प्रमुख मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष